जळगावात मालवाहू वाहनाला अपघात, दहा वर्षांच्या मुलासह १९ आदिवासी भाविक जखमी

जळगावातील मालवाहू वाहनाला अपघात होऊन १९ आदिवासी बांधव जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे आदिवासी बांधव मध्य प्रदेशात सत्संगाला चालले होते. त्यावेळी हा अपघात घडला आहे.

जळगावात मालवाहू वाहनाला अपघात, दहा वर्षांच्या मुलासह १९ आदिवासी भाविक जखमी
road accident
| Updated on: Oct 25, 2026 | 6:11 PM

मध्य प्रदेशातील सत्संगासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन १९ आदिवासी बांधव जखमी झाले आहेत. या मालवाहू वाहनातून हे आदिवासी बांधव सत्संगाला जात होते. त्यावेळी मालवाहू वाहनाच्या मागील चाकाचा एक्सेल तुटल्याने चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटून वाहन दोन वेळा पलटी झाले. त्यामुळे आदिवासी बांधवात प्रचंड घबराट पसरली. या जखमींवर जळगावातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगावात आदिवासी भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू वाहनातून आदिवासी बांधव मध्य प्रदेशात सत्संगाला जात होते. त्यावेळी मालवाहू वाहनाचे पाठचे एक्सेल तुटले आणि वाहन दोनदा उलटले. जळगावमधील कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. या अपाघातील जखमींना जळगावातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Loading...

जखमीत दहा वर्षांच्या मुलाचा सहभाग

या भीषण अपघातातील तीन जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाचाही समावेश असून तिघांना व्हेंटीलेंटरवर ठेवण्यात आले आहे.  किरकोळ जखमी झालेल्यांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे.  अलिकडे धार्मिक यात्रा, प्रवचनसाठी जाणाऱ्या वाहनांना मोठे अपघात होऊन त्यात भाविकांचे मृत्यू झाल्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.

मुंबई ते नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई ते नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  येथे घोटी टोलनाक्यापासून पासून ते टाकेघोटीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती दिली जात आहे. टोल प्रशासन आणि  महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us