फळ घेत असलेल्या 65 वर्षीय इसमाला जागीच निधन, असं काही होईल असा कोणी विचारही केला नसेल, जाणून घ्या घटनाक्रम

फळ घेत असलेल्या 65 वर्षीय इलमासोबत असं नक्की झालं तरी काय, ज्यामुळे त्यांचं जागीच निधन झालं... काही क्षणात असं काही भयानक घडेल असा कोणी विचारही केला नसेल... जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

फळ घेत असलेल्या 65 वर्षीय इसमाला जागीच निधन, असं काही होईल असा कोणी विचारही केला नसेल, जाणून घ्या घटनाक्रम
| Updated on: Apr 05, 2026 | 11:03 AM

आजच्या काळात कधी काय होईल सांगता येत आहे. आज आपल्या डोळ्यासमोर चालताना – फिरताना दिसत असलेला कधी नजरेआड जाईल काहीही सांगता येत आहे. सांगायचं झालं तर, आयुष्याबद्दल कोणाला काहीच सांगता येणार नाही. आता देखील असंच काही घडलं आहे. फळ घेत उभ्या असलेल्या 65 वर्षीय इसमासोबत असं काही झालं, ज्यामुळे त्यांचं जागीच निधन झालं. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, नक्की झालं तरी काय… तर जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम…

माटुंगा येथील चंदावरकर मार्ग परिसरात शुक्रवारी सकाळी एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका 65 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात केळीच्या हातगाडीसह अन्य तीन वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान असून, पोलिसांनी आरोपी कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास माटुंगा येथील चंदावरकर मार्गावरील त्रिलोक हॉटेलजवळ हणुमानचंद मिश्रा या फळविक्रेत्याच्या हातगाडीसमोर सोहराभ रूसी कोतवाल (65) हे केळी खरेदी करण्यासाठी उभे होते. त्याचवेळी ठाणे येथील रहिवासी रामकृष्णनन सुर्यनारायणन हा व्यक्ती आपली ‘हुंदाई वेन्यू कार (क्र. MH 04 KL 0752) घेऊन भरधाव वेगाने आला.

आरोपी चालकाने प्रथम रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टॅक्सीला धडक दिली. त्यानंतर गाडीचा वेग न कमी करता त्याने समोर उभ्या असते सोहराभ कोतवाल यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कारने कोतवाल यांना हातगाडी आणि स्टीलच्या खांबाच्या मध्ये चिरडलं आणि काही अंतर फरफटत नेले. यामध्ये कोतवाल गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी झालेल्या कोतवाल यांना तात्काळ रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादर त्यांचा मृत्यू झाला. या भीषण धडकेत केवळ पादचाऱ्याचा बळी गेला नाही, तर कारने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देऊन ती दुसऱ्या एका कारवर आदळली. यात टॅक्सी, दुचाकी, हातगाडी आणि उभ्या असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं आहे.

माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी हणुमानचंद मिश्रा यांच्या तक्रारीवरून चालक रामकृष्णनन सुर्यनारायणन याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 106 (1) निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि बेदरकारपणे गाडी चालवणे या कायद्या अंतर्गत अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us