अजितदादांनी शब्द दिला होता, आता एकही आमदार…सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली खंत; ते काम अधुरंच राहणार?

नुकताच अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये खंत व्यक्त केली आहे. 'झाडांच्या अनाथ आश्रमा'च्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात झाडे वाचवण्याची एक नवी चळवळ उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अजितदादांनी शब्द दिला होता, आता एकही आमदार...सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली खंत; ते काम अधुरंच राहणार?
sayaji shinde
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 27, 2026 | 4:28 PM

मला कोणाच्या भ्रष्टाचारात किंवा प्रोटोकॉलमध्ये रस नाही, मला फक्त झाडे जगवण्यात रस आहे,” अशा शब्दांत अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’चे प्रणेते सयाजी शिंदे यांनी रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवर आणि शासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. साताऱ्यात स्थापन केलेल्या ‘झाडांच्या अनाथ आश्रमा’च्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात झाडे वाचवण्याची एक नवी चळवळ उभी करणार असल्याचा निर्धार त्यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले सयाजी शिंदे?

मुलाखतीमध्ये बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, अजित दादांच्या मध्ये राजकारणात मध्ये जेवढा धूर्तपणा लागतो तेवढा होता. पण काम करण्यासाठी जो मोकळेपणा लागतो तो सर्व होता. माझे दोन्ही तिन्ही अनुभव होते जी कामे सांगितली ती पूर्ण झाली. अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची पद्धत बाकीच्यांमध्ये आहे का नाही मला माहित नाही पण अजितदादांच्या मध्ये होती. त्यावेळी मला दादांनी सांगितलं होतं की तुमच्या झाडांच्या चळवळीसाठी तुम्ही जर माझ्या पक्षात आला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. सध्या आमच्या पक्षाची परिस्थिती ठीक नाही. यावेळी तुम्ही जेवढे आमदार निवडून द्याल तेवढा देवराई करू. असा शब्द त्यावेळी दिला होता. आणि अचानक ते गेले.

व्यक्त केली खंत

पुढे ते म्हणाले, आता मी आमदारांना संपर्क करतोय पण माझे ते फोन उचलत नाहीत. किंवा जेवढा सपोर्ट करणं गरजेचं आहे तेवढं होत नाही. हा महाराष्ट्राचा दुर्दैवाचा भाग आहे. देवगिरी ते देवराई हा प्रकल्प राबवण्याचा माझा विचार आहे. हा प्रकल्प मी सर्व आमदारांना दाखवणार आहे. किमान दहा हजार झाडे 40 आमदारांनी लावणे अपेक्षित आहे.

एकनाथ शिंदेची भेट

सयाजी शिंदे एकदा एकनाथ शिंदे यांना भेटले होते. या भेटीविषयी बोलताना ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकदा भेटण्याचा योग आला होता. त्यावेळी साताराचे तात्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख हे सहकार्य करत नसल्याचे सांगितले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी जे बाहेर ऐकलं जातं त्याचा मला नक्कीच अनुभव घ्यायचा आहे. कारण मला धाडसासाठी सपोर्टची खूप गरज आहे. याबाबत मी त्यांना लवकरच भेटून झाडांबाबत सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. खरंतर एकनाथ शिंदे आणि मी स्वतः एकाच भागातील आहोत. साताऱ्यातील अकरा हिरे ज्यावेळीस आमचा सन्मान झाला होता त्यावेळेस आम्ही दोघे एकत्र आल्यावर एकनाथ शिंदे मूळचे सातारचे आहेत हे मला समजलं होतं.

Follow Us