अजित पवार यांच्या विमान अपघात दरम्यान खळबळ उडवणारी माहिती पुढे, थेट देवेंद्र फडणवीसही…

28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमानाने निघाले असता त्यांच्या विमानाची भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. यादरम्यान आता अत्यंत मोठा खुलासा झाला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघात दरम्यान खळबळ उडवणारी माहिती पुढे, थेट देवेंद्र फडणवीसही...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 22, 2026 | 9:25 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी अजित पवार बारामतीकडे निघाले. VSR कंपनीचे त्यांचे विमान सकाळी 8 वाजता मुंबई विमानतळाहून निघाले. बारामती विमानतळाच्या अगदी जवळ 8.45 ला त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. सुरूवातीला अपघात झाल्यानंतर सांगितले गेले की, या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले. मात्र, काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू विमान अपघातात झाला. विमान अपघाताची खळबळ उडून देणारी व्हिडीओ आली. आजही लोकांना विश्वास बसत नाहीये की, अजित पवार आपल्यात नाहीत. अजित पवार यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झाली.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विमान अपघातानंतर काही तासातच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. यादरम्यान पवार कुटुंबातील वादही पुढे आला. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल कल्पना नाही. आता अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अत्यंत मोठी माहिती ही पुढे येताना दिसतंय. ही खळबळ उडून देणारी माहिती आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून बारामतीत आले होते, त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ऑक्टोबरला बारामतीत आले होते. फलटणचे माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस याच कंपनीच्या विमानाने आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतरचे विमानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर याच विमानाने देवेंद्र फडणवीस मुंबईकडे परतले होते. VSR या विमान कंपनीवर रोहित पवार गंभीर आरोप करताना दिसत आहेत. फक्त अजित पवार हेच नाही तर राज्यातील आणि देशातील अनेक नेते VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करतात. VSR कंपनीचे विमान घेऊन 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले आणि बारातमती विमानतळाच्या जवळ भीषण अपघात झाला.