बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. प्रहारचे अध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा देखील दाखल कण्यात आला आहे.

बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
bacchu kadu
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 7:06 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. प्रहारचे अध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे, या प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिली, आहे, त्यानंतर बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यावर आता बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

कट रचणं हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, रक्त देणारे लोक आहोत. कोणाचा जीव घेणारे लोक नाही. मला बदनाम करण्यासाठी हा कट रचला गेला आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर दीड लाख रुपये मिळावे यासाठी आता मी आंदोलन करणार होतो. बच्चू कडूला बदनाम करण्याचा अटक करण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अशा पद्धतीने जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही स्वतःहून अटक होऊ, प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून आम्ही अटक करून घेऊ. मी उद्यापासून एव्हरेस्ट बेस कॅम्पला चाललो आहे. देवाचीच अकृपा झाली तर आम्ही काय करणार? सत्ता तुमची, एसपी तुमचा, फॉरेन्सिक लॅब तुमची. कट रचणं हा आमचा धंदा नाही, अशी प्रतिक्रिया आपल्यावर झालेल्या आरोपांवर बच्चू कडू यांनी दिली आहे.

बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता 

दरम्यान बच्चू कडू यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाल्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही.

 

 

Follow Us