जिवलग मित्रानेच केला गेम, परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचं कांड कसं आलं समोर ? हादरवणारा खुलासा

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींमधील 'मुली पटवण्याची' स्पर्धा आणि पैशांवरून झालेल्या वादानंतरच हे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले. मुख्य सूत्रधार अहमद अयानसह 8 जणांना अटक असून, तपासातून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपींच्या आपापसातील भांडणामुळेच हे प्रकरण उघडकीस आले.

जिवलग मित्रानेच केला गेम, परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचं कांड कसं आलं समोर ? हादरवणारा खुलासा
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण
| Updated on: Apr 17, 2026 | 11:38 AM

अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा येथे अनेक तरूणींचे लैंगिक शोषण करून त्या क्षणांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले. हे प्रकरण उघडकीस आल्यावर अख्खं राज्य हादरलं आहे. ब्लॅकमेलिंगचया उद्देशाने हे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. राज्याला हादरवणाऱ्या या प्रकरणात मुख्य सूत्रधार अहमद अयानसह एकूण 8 जणांना अद्याप अटक करण्यात आली असून, या केसमध्ये रोज नवनवे, धक्कादायक अपडेट्स समोर येत आहेत. पोलीस तपासातूनही या केसबद्दल बरीच हादरवणारी माहिती उघड होत आहे. याच प्रकरणात आता एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.

या केसमध्ये जे आरोपी आहेत, त्यांच्यात झालेल्या वादानंतर परतवाडामधील हे लैंगिक शोषण प्रकरण समोर आल्याचं उघड झालं आहे. ‘कोण जास्त मुली पटवणार?’ अशा तऱ्हेची स्पर्धा आरोपींमध्ये असायची. मुली पटवण्यावरून अयान अहमद आणि उझेर खान या आरोपींमध्ये स्पर्धा लागायची. मुलींसोबत अश्लील व्हिडीओ बनवून अयान हा उझेरला पाठवायचा असंही उघड झालंय. एवढंच नव्हे तर काही दिवसानंतर दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला आणि त्याच वादानंतर दोघांनीही हे व्हिडीओ व्हायरल करायला सुरूवात केली. त्यानंतरच परतवाडामधील तरूणींच्या लैंगिक शोषण प्रकरण समोर आल्याची माहिती उघड झाली आहे.

कोण जास्त मुली पटवणार ?

अयान आणि उझेर हे दोघेही चांगले मित्र होते. आपल्यापैकी कोण सर्वाधिक मुलींना पटवतं, कोण सर्वात जास्त मुलींना मोहात पाडतं, अशी त्या दोघांमध्ये स्पर्धा लागायची. अयान हा युट्यूबर असून त्या माध्यमातून त्याचे जवळपास 18 हजार फॉलोअर्स आहेत. अनेक मुलींचे लाईक्स, फोटो त्याला यायचे आणि तोदेखील स्वत:हून अनेक मुलींशी संवाद साधायचा, जवळीक वाढवायचा. तो ज्या मुलींना भेटायचा, तो त्यांच्याशी गप्पा मारायचा, त्यांच्यसोबत अश्लील कृत्य करायचा. एवढंच नव्हे तर या सर्व कृत्याचे व्हिडीओ तो त्याचा मित्र उझेरला पाठवात होता. बघ मी आजा या मुलींना भेटलो, त्यांच्याशी बोललो, असं सांगायचा. जास्तीत जास्त मुली पटवण्याची स्पर्धा या दोघांमध्ये रंगलेली होती. मुली पटवण्यावरून या दोन मित्रांमध्ये एका प्रकारे शर्यतच लागली होती.

पैशांवरून वाद आणि..

त्यामुळे अयानचे सर्व अश्लील फोटो आणि व्हिडीओ हे उझेरकडे जमा झाले होते. मात्र काही दिवसांनंतर उझेर आणि अयान या दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून वाद झाला. पण तो वाद इतका टोकाला गेला की उझरने अयानचा बदला घेण्याचं ठरवत आणि अयानचे सर्व व्हिडीओ आणि फोटो हे हळूहळू सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरूवात केली. जवळपास 10 दिवस हे फोटो आणि व्हिडीओ परतवाडा शहरामध्ये फिरत होते. त्यानंतर शहरातील काही लोकांनी या व्हिडीओची दखल घेतली आणि हे धक्कादायक प्रकरण अखेर उघडकीस आलं.

या केसमध्ये अनेकांना अटक करण्यात आली असून पोलिस याचा कसून तपास करत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमदने ज्या कठोरा नाका परिसरातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण केले होते, तो फ्लॅट पोलिसांनी तात्काळ सील केला आहे. पोलीस या फ्लॅटची कसून तपासणी करत आहे. चौकशीसाठी आरोपी अयानलाही या फ्लॅटवर आणण्याची शक्यता आहे.

 

Follow Us