VIDEO | अमरावतीत आग विझवायला आलेली फायर ब्रिगेडची गाडीच जळून खाक

| Updated on: Mar 30, 2021 | 11:26 AM

जंगलातील आग विझवण्यासाठी बोलावलेली तिवसा नगरपंचायतीची फायर ब्रिगेडची गाडी आग विझवण्यापूर्वीच जळून खाक झाली. (Amravati Fire Brigade car)

VIDEO | अमरावतीत आग विझवायला आलेली फायर ब्रिगेडची गाडीच जळून खाक
जंगलातील आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशमन दलाची गाडीच पेटली
Follow us on

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये जंगलात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने आग लागत आहे. आग विझवण्यासाठी तिवसा नगरपंचायतीची फायर ब्रिगेडची गाडी गेली होती. मात्र अग्निशमन दलाची ही नवीन गाडीच आगीत जळून खाक झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Amravati Tiosa Fire Brigade car charred in Jungle Fire)

अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये सारसी, सातरगाव रोडवर असलेल्या वन विभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे. आजही मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने ती विझवण्यासाठी तिवसा नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी गेली होती. मात्र अचानक या गाडीनेच पेट घेतला.

या अपघातात तिवसा नगरपंचायतीचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही अग्निशमन दलाची गाडी विझवण्यासाठी चांदूर रेल्वे येथील फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी गेली.

तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वन विभागानेच ही आग लावली होती. ती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र ही आग विझवण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतची गाडी जळून खाक झाली.

साताऱ्यातील जानाई मळाई डोंगरावर वणवे

सातारा शहरालगत असणाऱ्या डोंगरांवर वणवे लावण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे. जानाई मळाई डोंगरावर लागलेला वणवा तीन दिवस धुमसत राहिला. त्यामुळे डोंगरावरील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं.

दुसरीकडे, पुण्यातील नवीन कात्रज बोगद्याजवळील डोंगराला काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. कात्रज घाटातील शिंदेवाडी गावाजवळ असणाऱ्या डोंगरावर हा वणवा पेटला होता. घनदाट जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडं जळून खाक झाली.

संबंधित बातम्या :

VIDEO : कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर वणवा, आग आणखी पसरण्याची शक्यता

VIDEO | साताऱ्यातील वणवे धुमसतेच, जानाई मळाई डोंगरावर जाणाऱ्या भाविकांची गैरसोय

(Amravati Tiosa Fire Brigade car charred in Jungle Fire)