VIDEO : कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर वणवा, आग आणखी पसरण्याची शक्यता

नवीन कात्रज बोगद्याजवळील डोंगराला भीषण आग लागली आहे. (Pune Katraj tunnel Fire Broke out in Mountain)

VIDEO : कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर वणवा, आग आणखी पसरण्याची शक्यता


पुणे : नवीन कात्रज बोगद्याजवळील डोंगराला भीषण आग लागली आहे. पुण्यातील कात्रज घाटातील शिंदेवाडी गावाजवळ असणाऱ्या डोंगरावर हा वणवा पेटला आहे. ही आग आणखी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pune Katraj tunnel Fire Broke out in Mountain)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा हायवेजवळच्या शिंदेवाडी गावातील डोंगरावर संध्याकाळी उशिरापासून वणवा पेटला आहे. नवीन बोगद्याच्यावर कात्रज घाटात शिंदेवाडीच्या अगोदर ही आग लागली आहे. जवळपास चार ते पाच किमीपर्यंत ही आग पसरली असल्याचे बोललं जात आहे.

घनदाट जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडं जळून खाक झाली आहे. तसेच पक्ष्यांच्या घरट्यांचेही नुकसान झाल्याचे बोलल जात आहे. ही आग भीषण आहे. वाऱ्यामुळे ही आग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आग लागलेली जागा ही खासगी आहे. सध्या वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचत आहे. ही आग किती गंभीर आहे, हे अद्याप सांगता येणार नाही. मात्र आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. (Pune Katraj tunnel Fire Broke out in Mountain)

संबंधित बातम्या :

पुणे विद्यापीठाच्या तारखा ठरल्या, लगबग झाली, विद्यार्थ्यांनो परीक्षा देण्याची वेळ आली…!

पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार, लोणीकंद परिसरात भीतीचं वातावरण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI