महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं स्मरण, 15 किमीची पदयात्रा काढत काँग्रेसचं अभिवादन

| Updated on: Dec 06, 2022 | 10:51 AM

15 किमीची पदयात्रा काढत बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसचं अभिवादन...

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं स्मरण, 15 किमीची पदयात्रा काढत काँग्रेसचं अभिवादन
Follow us on

अमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण (Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din) दिन आहे. त्यानिमित्त त्यांना विविध माध्यमातून अभिवादन केलं जात आहे. काँग्रेसच्या (Congress) वतीनेही बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे. 15 किलोमीटरची रॅली काढत आंबेडकरांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं आहे. अमरावतीतील इर्विन चौक ते नया अकोला अशी 15 किलोमीटची अभिवादन पदयात्रा काढण्यात आली आहे.

अमरावतीत आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसकडून अभिवादन यात्रा काढण्यात आली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून या अभिवादन यात्रेला सुरुवात झाली आहे. पुढे नया अकोला येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी स्मारकापर्यंत ही अभिवादन यात्रा जाणार आहे. जवळपास 15 किलोमीटरची ही अभिवादन पदयात्रा असणार आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर देखील या यात्रेत उपस्थित आहेत.

काँग्रेसची ही अभिवादन रॅली नया अकोल्याकडे रवाना होऊन नया अकोल्यातील अस्थी स्थळाला अभिवादन करणार आहे. इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणारी ही रॅली शेगाव नाका, कठोरा नाका, हर्षराज कॉलनी, नवसारी, तिवसा, वलगाव मार्गे नया अकोल्याला पोहोचेल. ही रॅली नया अकोला इथे पोहचल्यानंतर अभिवादन सभा होईल. अन् रॅलीची सांगता होईल.

दादरला भीमसागर

दादरच्या चैत्यभूमीवरही अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री संजय राठोड, दीपक केसरकर यांनीही चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं.