Ashok Kharat Video: अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओचं कनेक्शन थेट मुंबईशी… कसे झाले कांड शूट? ऑफिसबॉयने A to Z सर्वकाही सांगितलं

Ashok Kharat Video: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे... ऑफिसबॉयनेच केला खरातचा भांडा फोड... अश्लील व्हिडीओचं मुंबईशी काय आहे कनेक्शन? चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat Video: अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओचं कनेक्शन थेट मुंबईशी... कसे झाले कांड शूट? ऑफिसबॉयने A to Z सर्वकाही सांगितलं
Ashok kharat
| Updated on: Apr 14, 2026 | 8:59 AM

Ashok Kharat Video : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवीन आणि धक्कादयक सत्य समोर येत आहे. ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर भोंदूबाबाचे महिलांसोबत अश्लील चाळे करताना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ते व्हिडीओ कोणी आणि कसे शूट केले याबद्दल हैराण करणारं सत्य समोर आलं आहे. खरातच्या ऑफिसमध्ये कुठे आणि कसे कॅमेरे सेट करण्यात आले आणि त्यासाठी लागणारं सर्व सामान कोणत्या दुकानातून खरेदी करण्यात आलं… धक्कादायक गोष्ट म्हणजे खरात याचे सर्व कांड कॅमेऱ्यात कैद करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, ऑफिसबॉय निरज जाधव आहे… खरात प्रकरणी तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत असताना SIT च्या हाती मोठे पुरावे लागले आहेत.

चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, निरज याने ‘स्पाय ऑपरेशन’साठी गरजेचं सर्व सामान मुंबई मधील ज जाधव याने मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रसिद्ध मनिष मार्केटमधील हेवन कलेक्शन या दुकानातून खरेदी केलं. निरज याने 1 स्पाय कॅमेरा, 1 हिडन कॅमेरा आणि 64 जीबीचा पेनड्राईव्ह आणि रेकॉर्डिंग सुरु राहवं म्हणून पॉवर बँक देखील खरेदी केलेली… SIT च्या चौकशीत ही मोठी माहिती समोर आली आहे.

कुठे ठेवलेला स्पाय कॅमेरा?

अशोक खरात याचे सर्व काळे कांड समोर आणण्यासाठी निरज याने मोठ्या चलाखीने योजना आखली होती… खरात याच्या ऑफिसमधील काळ्या रंगाच्या एका स्पीकरमध्ये त्याने छिद्र केले. त्यानंतर कोणाला कळणार देखील नाही, अशा पद्धतीत त्याने स्पाय कॅमेरे स्पिकरमध्ये बसवले. एवढंच नाही तर, रेकॉर्डिंगमध्ये खंड पडू नये म्हणून त्याने या कॅमेऱ्याला सातत्याने पॉवर बँक आणि USB केबलचे कनेक्शन दिले होते.

अशोक खरात प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे. अशात व्हिडीओ कसे शूट झााले ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात फार मोठी मदत झाली  आहे. जप्त करण्यात आलेला पेनड्राईव्ह आणि कॅमेरामधील फुटेज खरात यांच्या विरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. आता निरज याने अशोक खरात कांड समोर का आणलं… याचा तपास पोलीस करत आहेत.

रोज नवीन आणि धक्कादायक अपडेट समोर येत असल्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं चित्र समोर दिसत आहे.  खरात न्यायालयीन कोठडीत असून ईडीकडून कसून तपास सुरू आहे.

Follow Us