अखेर लिंगपिसाट खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला, उत्तराने सर्वच थक्क; काय दिली कबुली?

गेल्या कित्येक दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरातची चौकशी सुरु आहे. त्याला वेगवेगळ्या ओरापांसाठी अनेकदा कोर्टात हजर करण्यात आले. आता अशोक खरात पहिल्यांदाच कोर्टात बोलला असल्याचे समोर आले आहे.

अखेर लिंगपिसाट खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला, उत्तराने सर्वच थक्क; काय दिली कबुली?
Ashok Kharat
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 20, 2026 | 3:08 PM

अंधश्रद्धा, फसवणूक आणि अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेला वादग्रस्त ढोंगी बाबा अशोक खरातभोवती आता अंमलबजावणी संचालनालयाचा (ED) पास घट्ट आवळला गेला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खरातला नुकतेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात हजर केले. या हायव्होल्टेज सुनावणीदरम्यान कोर्टात प्रचंड नाट्य पाहायला मिळाले. नेहमी शांत राहणारा खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला, मात्र त्याने दिलेल्या उत्तराने न्यायाधीश आणि वकीलही चक्रावून गेले.

सुनावणीच्या सुरुवातीला ईडीने अशोक खरातची ७ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, ईडीचे तपास अधिकारी न्यायालयासमोर प्रकरणाचे गांभीर्य आणि कोठडीचे नेमके कारण स्पष्ट करू शकले नाहीत. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना सुनावले, “तपास अधिकाऱ्यांना प्रकरण नीट समजावून सांगता येत नाहीये, मग मी कसे समजावून सांगणार की त्यांना नक्की काय हवे आहे?” यानंतर वकिलांनी तातडीने कागदपत्रे हाती घेत तपास अधिकाऱ्यांना कोठडी मागण्याचे ठोस ग्राउंड्स वाचून दाखवण्यास सांगितले.

Loading...

ईडीने उघड केला काळा धंदा

ईडीच्या वकिलांनी कोर्टासमोर खरातच्या गुन्ह्यांची संपूर्ण कुंडलीच मांडली. खरातने स्वतःला ‘भगवान शिवाचा अवतार’ सांगून लोकांना कसे फसवले, याचे धक्कादायक तपशील समोर आले. लोकांना ब्लॅक मॅजिक (जादू टोणा) आणि जीव जाण्याची भीती घालून पूजेच्या नावाखाली खरातने कोट्यवधी रुपये उकळले. हर्षद पोफळे आणि ललित पोफळे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. तर दिनेश परब यांच्या तक्रारीनुसार, विविध विधींच्या नावाखाली ५ कोटींहून अधिक रुपये उकळून खरातने स्वतःसाठी गाड्या खरेदी केल्या आणि फार्महाऊस बांधले. तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डचाही त्याने गैरवापर केला. खरातच्या नावावर तब्बल ६० बँक खाती सापडली आहेत, ज्यामध्ये कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. खरातने एका खात्यातून ३२ लाख रुपये आपली पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यावर पाठवले. आतापर्यंत ईडीला खरातच्या तब्बल ७० मालमत्ता सापडल्या असून, त्यातील अनेक मालमत्ता पत्नी कल्पनाच्या नावावर खरेदी केल्या आहेत.

६ वर्षांत कोणी तक्रार का केली नाही?

अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, महिलांशी गैरवर्तन आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांचा तपास सध्या ‘एसआयटी’ (SIT) करत आहे. ईडी केवळ आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) प्रकरणाचा तपास करत आहे. ६० बनावट बँक खात्यांच्या आरोपावर वकिलांनी प्रश्न उपस्थित केला की, “ही खाती २०२१ मध्ये उघडण्यात आली होती, मग गेल्या ६ वर्षांत एकाही व्यक्तीने माझ्या नावाने बनावट खाते का उघडले, अशी तक्रार का केली नाही?” यावर न्यायाधीशांनी विचारले की, या ६० लोकांमध्ये खरातचे नातेवाईक आहेत का? त्यावर वकिलांनी सांगितले की, यात नातेवाईकांशिवाय इतरही अनेक लोक आहेत, पण कोणीही तक्रार केलेली नाही.

पतसंस्थेच्या मॅनेजरवर फोडले खापर

सुनावणीदरम्यान जेव्हा न्यायाधीशांनी खरातला विचारले, “तुमच्यावर काय आरोप आहेत ते तुम्हाला कळतायत का? काही सांगायचे आहे का?” तेव्हा खरातने बोलायला सुरुवात केली. खरातच्या उत्तराने कोर्टात उपस्थित सर्वच थक्क झाले.

खरात म्हणाला, “माझ्याकडे जे पैसे आले, त्याबद्दल मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला सांगितले होते. ही सहकारी बँक असून तिथे ९ टक्के व्याज मिळते, असे मॅनेजरने मला सांगितले आणि सर्व पैसे वेगवेगळ्या खात्यात ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसारच मी ते पैसे बँकेत ठेवले होते.” जेव्हा कोर्टाने त्याला दुसरा टोकदार प्रश्न विचारला की, “जर पैसे तुमचे होते, तर त्या सर्व ६० खात्यांवर तुम्हालाच ‘नॉमिनी’ (वारस) करण्याचे आणि तुमचाच मोबाईल नंबर जोडण्याचे कारण काय?” यावर खरातने हात झटकत उडवाउडवीचे उत्तर दिले. तो म्हणाला, “त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. तपास झाला आणि आता मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढच मला माहीत आहे.”

अखेर २६ मे पर्यंत ईडी कोठडी!

अशोक खरातने चौकशीत सहकार्य न केल्याने आणि कोट्यवधी रुपयांच्या या महाघोटाळ्याचा मुख्य स्त्रोत (Source of money) शोधणे गरजेचे असल्याने न्यायालयाने ईडीचा युक्तिवाद ग्राह्य धरला. न्यायालयाने अखेर २६ मे पर्यंत अशोक खरातला ईडी कोठडी सुनावली आहे. या कोठडीदरम्यान ईडी खरातच्या ६० बँक खात्यांमधील पैशांचे गूढ आणि ७० मालमत्तांचे जाळे उघडकीस आणणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us