Aurangabad | राज्यात शाळा, घरकुलासाठी निधी नाही, माझी पेन्शन बंद करा, औरंगाबादचे आमदार हर्षवर्धनांचे काय पत्र?

| Updated on: Apr 18, 2022 | 4:15 PM

तसेच मी स्वतः एक शेतकरी असून माझ्या नावावर फक्त सहा एकर जमीन आहे. शेतीचा खर्च आणि मिळणारा भाव विचार करता मला शेतीतून उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. तथापि मला त्वरीत रेशन कार्ड देऊन शासकीय धान्य देण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

Aurangabad | राज्यात शाळा, घरकुलासाठी निधी नाही, माझी पेन्शन बंद करा, औरंगाबादचे आमदार हर्षवर्धनांचे काय पत्र?
आमदारकीची पेंशन रद्द करण्याची हर्षवर्धन जाधव यांची मागणी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद : लक्षवेधी आंदोलनं आणि वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारे औरंगाबादचे कन्नडचे आमदार (MLA) हर्षवर्धन जाधव (Harshwardhan jadhav) यांनी पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं वक्तव्य केलं. यंदा फक्त वक्तव्य न करता त्यांनी तशी कृतीही करून दाखवल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच आमदारांचे कान टवकारले आहेत. राज्यातील मुलांच्या शाळांसाठी निधी उपलब्ध नाही. घरकुलासाठीही राज्य सरकारकडे (Maharashtra government) निधी नाही. त्यामुळे माझी आमदारकीची पेन्शन बंद केली जावी. किमान हा पैसा तरी तिकडे वळवता येईल, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार जाधन यांनी कन्नड येथील तहसीलदारांकडे यासंबंधीचे निवेदन सादर केले.

आमदार हर्षवर्धन जाधवांचे निवेदन काय ?

हर्षवर्धन जाधव यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, ‘ राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्य आणि संपूर्ण देश दिवाळखोरीत जात आहे. त्यामुळे जे त्यांना मतदान करतात, त्यांच्यातही काहीच परिवर्तन होत नाही. सदर स्थिती भविष्यात बदलेल, असं कोणतंही लक्षण नाही. त्यामुळे सर्वसामान्य इमानदार माणूस होरपळला जात असून मुलांची फीस भरण्यापासून पेट्रोलपर्यंत सर्वच गोष्टी अशक्य झाल्यात. मुलांची फीस पालक भरू शकत नाहीत. शासकीय शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता रसातळाला गेली आहे. गृहिणींना स्वयंपाक घर चालवण्यासाठी या दिवाळखोरीतल्या सरकारला मी माझ्या वतीने एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून माझी आमदारकीची पेन्शन बंद करावी अशी विनंती करतो’.

‘मला रेशन कार्ड मिळावे…’

आमदारकीची पेन्शन रद्द करतानाच आमदार हर्षवर्धन जाधन यांनी सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे. ते म्हणाले ,’ पंखा असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला घरकुल मिळत नसेल आणि नावावर एखाद्या जमिनीचा तुकडा असला तरीही निराधार महिलांना शासन अर्थसहाय्य करत नसेल तर मलाही शासनाकडून अर्थसहाय्य मिळण्याचं कुठलंही कारण नाही. तथापि, आपणास विनंती करतो की, ही बाब शासनाला कळवून त्वरीत माझं पेंशन बंद करण्याच्या संदर्भात आदेश पारीत करण्यासंदर्भात कारवाई करावी. तसेच मी स्वतः एक शेतकरी असून माझ्या नावावर फक्त सहा एकर जमीन आहे. शेतीचा खर्च आणि मिळणारा भाव विचार करता मला शेतीतून उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. तथापि मला त्वरीत रेशन कार्ड देऊन शासकीय धान्य देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.’

इतर बातम्या-

Raj Thackeray | तो येईल भाषण करून जाईल, थोडं एंटरटेनमेंट होईल… राज ठाकरेंच्या सभेचा प्रश्न सुप्रिया सुळेंनी पुन्हा उडवून लावला

Rajesh Tope : महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा बाहेर, राजेश टोपेंची सत्तार, भुमरेंवरती उघड नाराजी