Raj Thackeray | तो येईल भाषण करून जाईल, थोडं एंटरटेनमेंट होईल… राज ठाकरेंच्या सभेचा प्रश्न सुप्रिया सुळेंनी पुन्हा उडवून लावला

औरंगाबादः राज ठाकरेंची (Raj Thackeray) येत्या महाराष्ट्र दिनाला औरंगाबादमध्ये होऊ घातलेली सभा हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष यावर गांभीर्याने भूमिका मांडत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र हा विषय फार गांभीर्यानं घेण्यासारखा नाही, असा पुनरुच्चार केलाय. राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतरही त्यांनी अशीच […]

Raj Thackeray | तो येईल भाषण करून जाईल, थोडं एंटरटेनमेंट होईल... राज ठाकरेंच्या सभेचा प्रश्न सुप्रिया सुळेंनी पुन्हा उडवून लावला
सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 3:20 PM

औरंगाबादः राज ठाकरेंची (Raj Thackeray) येत्या महाराष्ट्र दिनाला औरंगाबादमध्ये होऊ घातलेली सभा हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष यावर गांभीर्याने भूमिका मांडत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र हा विषय फार गांभीर्यानं घेण्यासारखा नाही, असा पुनरुच्चार केलाय. राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतरही त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर पुण्यातील सभेत त्यांनी औरंगाबादमधील सभेची (Aurangabad MNS) घोषणा केली. त्यावर  पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया विचारली असताना, सुप्रिया सुळेंनी या प्रश्नाची खिल्लीच उडवली. तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही तुमचं काम करा ना.. अशा शब्दात त्यांनी हा विषय टोलवला. सुप्रिया सुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळेंना अशी उडवली खिल्ली…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी  ही प्रतिक्रिया दिली.  यावेळी एका कार्यकर्त्याने राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेबाबत प्रश्न विचारला, त्यावर त्या म्हणाल्या, तो येईल, भाषण देऊन निघून जाईल. तुम्ही तुमचे काम कराना. इतकं महत्त्व देताच तुम्ही कुणाला…..

दूरदर्शन किती पहायचं.. कधी दुसरे चॅनलही पहा ना…

राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन असतं, अशी खोचक टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘थोडा एंटरटेनेमेंटपण होऊ द्या ना… सगळं सिरियस कशाला व्हायला पाहिजे. नेहमीच दूरदर्शन का पहायचं… कधी कधी *** चॅनल पण पहावं ना.. ‘ सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया व्यक्त करताच सभागृहात मोठा हशा पिकला.

महाराष्ट्रदिनी राज ठाकरेंची सभा

औरंगाबादमध्ये येत्या 01 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गाजली होती, त्याच ठिकाणी राज ठाकरेंची ही सभा घेतली जाणार आहे. औरंगाबाद मनसेने यासाठी तयारीही सुरु केली आहे. येत्या 03 मेपर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरचे भोंगे हटवले पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पुण्यातील सभेत दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादसारख्या अत्यंत संवेदनशील शहरातील ही सभा महत्त्वाची आहे. कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रश्न उद्धवू शकतात, अशी शंकाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेकडे लागले आहे.

इतर बातम्या-

Jayshree Patil Viral Video : जयश्री पाटील यांचा आक्रस्थाळेपणा, कुणावर उचलला हात?

Nawab Malik ED : दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...