AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : गोविंदा आणि सुनीताच्या नात्यात तणाव, घेणार घटस्फोट ? लेक टीनाने सोडलं मौन…

Govinda : अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत. अलिकडेच सुनीताने गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधाचे संकेतही दिले होते. दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांच्यातील दुरावा निर्माण झाल्याच्या अफवांवर आता मुलगी टीना आहुजाने मौन सोडलंय.

Govinda : गोविंदा आणि सुनीताच्या नात्यात तणाव, घेणार घटस्फोट ? लेक टीनाने सोडलं मौन...
गोविंदा आणि सुनिता बददल काय म्हणाली लेक?Image Credit source: social media
| Updated on: Mar 11, 2026 | 9:41 AM
Share

Tina Ahuja on Govinda and Sunita: बॉलीवूडचा हिरो नंबर 1, मानला जाणारा अभिनेता गोविंदा (Govinda) हा गेल्या बऱ्याच काळापासून त्याच्या कामामुळे नव्हे तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांचा नात्यात, लग्नात काही आलबेल नसल्याच्या खबरा समोर येत आहेत. त्यांच्यात बरेच वाद, खिटपिट सुरू असल्याचेही बोललं जात असून त्या दोघांचा घटस्फोही होऊ शकतो, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, गोविंदा किंवा सुनीता, याच्यांपैकी विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केलेलं नाही. मात्र, याच दरम्यान, या जोडप्याची मुलगी टीना आहुजा हिने आई-वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य करत मौन सोडलं आहे. गेली काही वर्ष आमच्यासाठी चांगली गेलेली नाहीत, असंही तिने कबूल केलंय.

गोविदांची पत्नी, सुनिता आहुजा ही तिच्या यूट्यूब चॅनेलवर खूप ॲक्टिव्ह असते. मंगळवारी पोस्ट करण्यात आलेला सुनिता अहुजा यांचा लेटेस्ट व्लॉग, त्यांची मुलगी टीना अहुजाने सांभाळला. जागतिक महिला दिनानिमित्त तिने आईला सरप्राईज दिलं आणि तिला एक सॉलिटेअर रिंग सुद्धा गिफ्ट केली. टीना तिच्या पालकांच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दलही बोलले आणि गेल्या काही वर्षांत गोष्टी चांगल्या नव्हत्या, हे मान्य केले.

काय म्हणाली टीना आहूजा ?

आईला सरप्राईज देण्यासाठी तिचा व्लॉग हायजॅक करत असल्याचे टीनाने सुरूवातीलाच जाहीर केलं. “आम्ही महिला इतरांसाठी खूप काही करतो आणि स्वतःबद्दल विचार करत नाही. म्हणून मी माझ्या आवडत्या महिलेसाठी काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला.” असं ती म्हणाली. मात्र त्यानंतर गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाबद्दलची बातमी पडद्यावर आली. “गेली दोन वर्षं चांगली गेली नाहीत; खूप चढ-उतार आले” असं टीना या अफवाबद्दल बोलताना म्हणाली.

नंतर टीनाने सुनीताला सॉलिटेअर अंगठी भेट दिली. याबद्दल बोलताना सुनीता म्हणाली, “टीना एका दागिन्यांच्या डिझाइन कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे आणि ही तिने मला दिलेली भेट आहे. तिने पैसे कमवले, म्हणून तिने मला ही भेट दिली. माझ्या कलेक्शनमधील ही आणखी एक सॉलिटेअर अंगठी आहे ” असं सांगत सुनिताने लेकीचं कौतुक केलं.

गोविंदावर लावले होते आरोप

गोविंदाचे कोमल नावाच्या अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप सुनिता अहुजा हिने यापूर्वी केला होता. मात्र, गोविंदाने हे सर्व दावे फेटाळून लावले. सुनिता व गोविंदाच्या नात्यातील चढउतार,तणाव यामुळे त्यांचे चाहते चिंतीत होते.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर