Nawab Malik ED : दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ

Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा मिळतो का, याकडे आज सगळ्यांची नजर लागली होती. कारण नवाब मलिकांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती.

Nawab Malik ED : दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ
नवाब मलिकांबाबत मोठी अपडेटImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 7:15 PM

मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ईडीनं नवाब मलिकांना अटक (Nawab Malik ED Arrest) केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांच्या संबंधित कुटुंबीयांच्या मालमत्तांवर कारवाईही करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयानं आता नवाब मलिकांच्या कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आरोग्याच्या समस्यांबाबत तक्रार केल्यानंतर नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, याआधी नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतीतल्या जेजे रुग्णालयातही (JJ Hospital in Mumbai) दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आता नवाब मलिक यांच्या पायाला सूज असल्याचं सांगितलं जातंय. किडनीच्या आजारामुळे त्यांच्या पायाला सूज येतेय. त्यांना कारागृह प्रशासनाकडून पेनकिलर्सही देण्यात येत होत्या. मात्र मलिकांनी यावर कायस्वरुपी उपचार करण्याची मागणी केली होती.

दिलासा नाहीच!

नवाब मलिक यांना दिलासा मिळतो का, याकडे आज सगळ्यांची नजर लागली होती. कारण नवाब मलिकांची न्यायालयीन कोठडी आज (18 एप्रिल, 2022) संपत होती. मात्र त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा जार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय.

दुसरीकडे आता नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई उच्च न्यायालयानं मलिकांना जामीन देण्याची मागणी फेटाळून लावली होती. विशेष सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयानं मलिकांचा जामीन अर्जावर फेटाळला होता. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात याबाबत दाद मागण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टात मलिकांच्या बाजून प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल हे युक्तीवाद करणार आहेत.

नवाब मलिकांवर काय आरोप?

अंडरवर्ल्ड डॉन आणि फरार दाऊन इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही अटक करण्यात आली. ईडी तपासात मलिकांनी सहकार्य केलं नसल्याचा दावा करत ही अटक करण्यात आली होती.

आठ ठिकाणी कारवाई

दरम्यान, नुकतीच ईडीनं नवाब मलिकांच्या आठ मालमत्तांवर टाच आणली होती. यात मुंबई आणि उस्मानाबादेतील मालमत्तांचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत मुंबईच्या वांद्रेतील एका घराचाही समावेश होता.

संबंधित बातम्या :

Special Report | Mumbai ते Osmanabad पर्यंत Nawab Malik यांची संपत्ती जप्त -tv9

कुर्ल्यापासून ते उस्मानाबादपर्यंत नवाब मलिकांचं संस्थान खालसा; दाऊदच्या बहिणीचा रोल काय?

राऊतांसाठी Sharad Pawar मोदींना भेटले, नवाब मलिकांसाठी का नाही? खा. इम्तियाज जलील यांचा सवाल

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.