AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं आयुष्य बरबाद झालंय… निर्मात्याने लोकप्रिय अभिनेत्रीसोबत केलं तरी काय? हैराण करणारा Video समोर

सुपरहिट सिनेमा देत एका रात्रीत चमकलेल्या अभिनेत्रीचं आयुष्य कोणी केलं उद्ध्वस्त... निर्मात्याने असं केलं काय? हैराण करणारा Video अखेर समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

माझं आयुष्य बरबाद झालंय... निर्मात्याने लोकप्रिय अभिनेत्रीसोबत केलं तरी काय? हैराण करणारा Video समोर
अभिनेत्री अदा शर्मा
| Updated on: Mar 11, 2026 | 9:44 AM
Share

इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या समोर आल्यानंतर इंडस्ट्रीची एक काळी बाजू समोर येत.. शिवाय इंडस्ट्रीमध्ये किती आणि कशा स्वभावाची माणसं आहेत… हे देखील समोर येतं… आता देखील प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक हैराण करणारा व्हिडीओ समोर येत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘द केरळा स्टोरी’ सिनेमातून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अदा शर्मा आहे… अदा शर्मा हिच्याकडे गेल्या एक महिन्यापासून कोणतंच काम नाही. निर्मात्यांच्या एका चुकीमुळे अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य बरबाद झालं आहे… असं देखील अदा म्हणाली आहे. सध्या अदा हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये, अदा शर्मा स्पष्ट करतेय की, निर्मात्याने तारखा बदलत राहिल्यामुळे मोठा गोंधळ झाला आहे. तिने स्पष्ट केलं की, इतर दोन प्रोजेक्टच्या निर्मात्यांना पहिल्या निर्मात्यामुळे अखेर तारखा बदलाव्या लागल्या. तिच्या मॅनेजरचा पहिल्या सिनेमाच्या निर्मात्याशी जोरदार वादही झाला. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे.

व्हिडीओ पोस्ट करत अदा म्हणते, ‘निर्मात्यांनी सांगितलं काहीही झालं तरी मला हिच तारीख हवी आहे… माझ्या मॅनेजरने निर्मात्यांना विचारलं, खरंच तुम्हाला हिच तारीख हवी आहे का? यावर त्यांनी होकार दिला… त्यामुळे दुसऱ्या दोन सिनेमांच्या निर्मात्यांनी समजून घेत तारखा बदलल्या… यामुळे हे सिद्ध होतं की, इंडस्ट्रीमध्ये फक्त वाईट व्यक्तीच नाहीत… चांगली लोकं देखील आहेत. तारखांचा गोंधळ संपल्यानंतर पहिल्या निर्मात्याने पुन्हा तारखा बदलल्या…’

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तारखांच्या या गोंधळामुळे माझ्याकडे गेल्या एक महिन्यापासून काम नाहीये.. संताप व्यक्त करत अदा म्हणाली, ‘माझं आयुष्य आता उद्ध्वस्त झालं आहे. गेल्या एक महिन्यापासून मी घरीच बसली आहे. भावनिक, मानसिक, आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या नुकसान झालं आहे.’, सध्या अदा हिच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

अदा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अदा हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. अभिनेत्री त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही, आता चाहते तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर