देशात महागाईचा भडका, इंधन दरवाढीने ओला, रिक्षाचालक आर्थिक संकटात; सांगितली घरातील बिकट परिस्थिती

देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे इंधन दरवाढीने ओला, रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

देशात महागाईचा भडका, इंधन दरवाढीने ओला, रिक्षाचालक आर्थिक संकटात; सांगितली घरातील बिकट परिस्थिती
auto drivers
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 11:20 AM

दीपक कापरे : देशात महागाईचा भडका उडाला आहे. सिलिंडर, पेट्रोल, सिएनजीच्या दरात वाढ झाली आहे. काही ठिकाणी सीएनजीचे दर शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सिलिंडर, सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने दरवाढीचा भुर्दंड आता सीएनजी वाहनचालकांना सहन करावं लागणार आहे. या दरवाढीमुळे कुटुंबाच्या दैंनदिन गरजा पुरवणे मुश्किल झाल्याचे व्यथा ओला-उबेर रिक्षाचालकांनी मांडल्या आहेत.

पेट्रोलची डिझेलच्या भाववाढीनंतर सीएनजी दरात देखील वाढ झाली आहे. काही ठिकाणी सीएनजी दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजीला किलोमागे 97 रुपये 75 पैसे किमत लागू होणार आहे. या दरवाढीमुळे सीएनजी वाहनचालकांना आता दोन रुपयांचा करावा लागणार भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

एका सीएनजी वाहनाधारकने म्हटलं की, आम्ही कितीही सरकारकडे विनवण्या केल्या तरी सरकार आमचं ऐकत नाही. सीएनजी दरात सरकार वाढ करणारच आहे, अशा शब्दात सीएनजी वाहनधारकांनी भावना व्यक्त केल्या.सीएनजी दरवाढीमुळे ओला उबेर आणि रिक्षा व्यवसायात काही शिल्लक राहत नाही. अगदी कुटुंबाच्या दैनंदिन गरजा चालवणे देखील मुश्किल झालंय, असं दु:ख ओला उबेर आणि रिक्षा चालकांनी व्यक्त केलं. सीएनजी दोन रुपयांनी वाढल्याने आम्हाला मोठा करावा भुर्दंड सहन करावा लागतोय, असे त्यांनी सांगितले.

ठाण्यातही भाडेवाढ होणार

ठाण्यातही सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली. नवीन दर 88 रुपये प्रति किलो झाला आहे. घरगुती पीएनजी पाईप गॅसच्या दगरात प्रति 1 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात आता रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता रिक्षाचालकांनी वर्तवली आहे. ही भाडेवाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. येत्या दिवसांत रिक्षा, टॅक्सी संघटना काय भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागल आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us