Beed | परळीच्या सावळाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव, पाळण्याची दोरी हाती घेत पंकजा मुंडेंचाही सहभाग, भजनही म्हटले

| Updated on: Apr 10, 2022 | 3:00 PM

राम जन्मोत्सवापूर्वी मंदिरात पारंपरिक पद्धतीने आरती आणि भजनाचा कार्यक्रम झाला. पंकजा मुंडे यांनी मंदिरात स्वतःच्या हाताने आरती केली. तसेच मंदिरात सुरु असलेल्या भजनातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Beed | परळीच्या सावळाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव, पाळण्याची दोरी हाती घेत पंकजा मुंडेंचाही सहभाग, भजनही म्हटले
परळीत रामनवमीच्या उत्सवात पंकजा मुंडे यांचा सहभाग
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बीड | देशभरात आज श्री रामांचा जन्मोत्सव (Ramnavami Festival) साजरा केला जातोय. परळीच्या श्री सावळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) या उत्सवावर निर्बंध आले होते. यावर्षी हा उत्सव ठिकठिकाणी जोरदार पद्धतीने साजरा होत आहे. राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सावळाराम मंदिरातील जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित होत्या. पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा आणि आरती करण्यात आली. श्रीराम जन्माच्या नंतर बाळ रामाचा पाळणा हलवून पाळणा गीत म्हणण्यात आले. पंकजाताई यांनीही उपस्थित महिलांच्या सोबत पाळण्याची दोरी हाती घेत पाळणा म्हणत पूजेत सहभाग घेतला. त्याअगोदर हाती टाळ घेऊन भाजनही म्हटले.

श्रीरामांचा जन्म उत्साहात

परळीच्या श्रीराम जन्मोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतः हजेरी लावून उत्साहात सहभाग नोंदवला. या मंदिरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास श्रीरामांचा जन्मोत्सव करण्यात आला. यावेळी मंदिरात जमलेल्या महिला भाविकांनी पाळणा हलवून रामाचा पाळणा गीतही म्हणले. विविधरंगी फुलांनी सजवलेल्या या पाळण्याला हलवत पंकजा मुंडेंनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.

हाती टाळ घेऊन भजन आणि आरतीही केली

राम जन्मोत्सवापूर्वी मंदिरात पारंपरिक पद्धतीने आरती आणि भजनाचा कार्यक्रम झाला. पंकजा मुंडे यांनी मंदिरात स्वतःच्या हाताने आरती केली. तसेच मंदिरात सुरु असलेल्या भजनातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

इतर बातम्या-

13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली, बचावलेल्या महिलेने सांगितली अपघाताची सत्यता

Sangli : सांगलीवाडीच्या शिवारात बैलगाडा शर्यतीचा धुरळा, शर्यतीमध्ये ना काठी-ना लाठी