Beed Farmer Death : बीडमध्ये शेतात काम करताना अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

| Updated on: Jun 21, 2022 | 12:05 AM

परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील रहिवासी असलेले माणिक मुंडे हे शेतावर काम करत होते. शेतात पेरणी करून रासनीचे काम सुरु होते. पेरणी झाल्यानंतर रासनीचे काम करत असताना अचानक सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट सुरु झाला. यावेळी अंगावर वीज कोसळून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Beed Farmer Death : बीडमध्ये शेतात काम करताना अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Follow us on

बीड : शेतात काम करत असताना अंगावर वीज (Lightning) पडून एका शेतकऱ्या (Farmer)चा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. माणिक बाबुराव मुंडे (40) असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मयत माणिक यांच्या पश्चात आई वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. माणिक यांच्या मृत्यूमुळे मुंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील रहिवासी असलेले माणिक मुंडे हे शेतावर काम करत होते. शेतात पेरणी करून रासनीचे काम सुरु होते. पेरणी झाल्यानंतर रासनीचे काम करत असताना अचानक सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट सुरु झाला. यावेळी अंगावर वीज कोसळून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये दुर्दैवाने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

वडवणी तालुक्यातील 13 गावांचा संपर्क तुटला

बीडचा वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. परिणामी 13 गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री झालेल्या पावसात एक दुचाकीस्वार यात वाहून गेला. माञ ग्रामस्थांच्या मदतीने याला वाचविण्यास यश आलंय. मान्सूनमध्ये दर वर्षी या पुलाची हीच दुरावस्था होते. लोकप्रतिनिधींना सांगून देखील अद्याप हा प्रश्न जैसे थे च आहे. त्यामुळे याठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पालघरमध्ये कोसळलेल्या विजेचा झटका लागून बालकाचा मृत्यू

घराच्या अंगणात खेळत असताना कोसळलेल्या वीजेचा झटका लागून एका दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर तालुक्यातील मनोरजवळील येंबुर गावात घडली आहे. यश सचिन घाटाल असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वीजेचा झटका लागल्यानंतर यशला तात्काळ मनोर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर घाटाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Farmer dies after being struck by lightning while working in a field in Beed)