Kalyan Crime : कल्याण अल्पवयीन मुलीची आत्महत्या प्रकरण, आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

सुरुवातीस हे प्रकरण आत्महत्येपुरते मर्यादीत होते. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी सखोल तपास केला असता पोलीस तपासात तरुणीच्या मोबाईलमधील तिने तिच्यावर कशा प्रकारे अत्याचार झाला, याच्या नोट्स लिहून ठेवल्या असल्याचे आढळले. कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणात सात तरुण आणि एक तरुणीला पोलिसांनी अटक केली होती.

Kalyan Crime : कल्याण अल्पवयीन मुलीची आत्महत्या प्रकरण, आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ
कल्याण अल्पवयीन मुलीची आत्महत्या प्रकरण, आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 20, 2022 | 7:33 PM

कल्याण : कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assault) करुन तिचा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. या प्रकरणातील आठ आरोपींना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली होती. त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा आज कल्याण न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली आहे. या घटनेचा सखोल तपास अजून सुरु असल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले.

आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसाची कोठडी

सुरुवातीस हे प्रकरण आत्महत्येपुरते मर्यादीत होते. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी सखोल तपास केला असता पोलीस तपासात तरुणीच्या मोबाईलमधील तिने तिच्यावर कशा प्रकारे अत्याचार झाला, याच्या नोट्स लिहून ठेवल्या असल्याचे आढळले. कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणात सात तरुण आणि एक तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. अटक आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केलं असता त्यांना यापूर्वी पाच दिवसांची कोठडी मिळाली होती. या घटनेनंतर कल्याण शहरात एकच संतापाची लाट पसरली होती. पोलीस देखील या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. दरम्यान, आज आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्काराचे कलम आणि आयटी अॅक्टची कलमे लावण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासाअंती ही कलमे वाढवण्यात आली आहे. (Four days extension in police custody of accused in Kalyan minor girls suicide case)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें