भंडारा वनपरिक्षेत्रात खळबळ, एकाचवेळी वाघाचे तीन बछडे आणि अस्वल मृतावस्थेत आढळले

| Updated on: May 13, 2021 | 8:30 AM

भंडाऱ्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वाघाचे दोन महिन्याचे तीन बछडे आणि एक अस्वल मृतावस्थेत आढळून आले आहे. (Bhandara forest reserve Four Animal died)

भंडारा वनपरिक्षेत्रात खळबळ, एकाचवेळी वाघाचे तीन बछडे आणि अस्वल मृतावस्थेत आढळले
bhandra forest tiger death
Follow us on

भंडारा : भंडाऱ्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वाघाचे दोन महिन्याचे तीन बछडे आणि एक अस्वल मृतावस्थेत आढळून आले आहे. भंडारा वन विभागांतर्गत येणाऱ्या भंडारा आणि पवनी वनपरिक्षेत्रात ही घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्राण्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhandara forest reserve Four Animal died)

एका बछड्याचा पाण्यात बुडून मृत्यू

भंडारा वन विभागांतर्गत येणाऱ्या भंडारा वनपरिक्षेत्रातील गराडा येथे टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाचा कालवा आणि तलावाला जोडणारा सायफन (वेस्ट वेअर) आहे. यात गराडा बिटातील संरक्षित वनातील कक्ष क्रमांक 178 मधील या सायफनमध्ये पाण्यात बुडून वाघाच्या दोन महिन्यांच्या बछड्याचा मृत्यू झाला.

तर इतर दोघांचा अन्न पाण्याअभावी मृत्यू 

तर दुसरी घटना ही पवनी वनपरिक्षेत्रातील गुडेगाव परिसरात घडली. यात वाघाचा नर प्रजातीचा दोन महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळला. त्याचा अन्न पाण्याअभावी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

या बिटात एका मादीला दोन बछडे होते. त्यातील एका बछड्याला घेऊन वाघीण निघून गेली होती. गेल्या 28 मार्चपासून वनविभागाचे कर्मचारी या बछड्यावर पाळत ठेवून होते. या बछड्याला मादी वाघीण दूध पाजत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे वन विभागाने त्याची देखरेख सुरू केली होती. त्याला शेळी गावालगत एका शेतशिवारात ठेवण्यात आले होते. मात्र आज सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला.

अस्वलच्या पाठीवर गंभीर जखमा 

तर तिसरीकडे रावणवाडी जलाशयालगत असलेल्या खापा बिटातील राखीव वनात एक नर प्रजातीचा अस्वल मृतावस्थेत आढळून आला. त्याचे वय अंदाजे सात वर्षे असून वजन 200 किलोच्या आसपास आहे. या अस्वलाच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्या आहेत.

वन्य प्रेमींमध्ये हळहळ

दरम्यान भंडारा वन विभागामध्ये एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे आणि अस्वलाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच चार प्राण्यांच्या मृत्यूमुळे वन्य प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhandara forest reserve Four Animal died)

संबंधित बातम्या : 

Video | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय ?

Aurangabad Tiger | समृद्धी वाघिणीच्या बछड्यांचा मुक्त संचार