AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय ?

या व्हिडीओमध्ये आपलं सावज पकडण्यासाठी वाघाचे बछडे आणि वाघ टपून बसलेले आहेत. (tiger monkey video goes viral)

Video | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय ?
TIGER MONKEY VIRAL VIDEO
| Updated on: May 11, 2021 | 7:45 PM
Share

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व मोठं व्यापक आहे. येथे रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. रोज नव्याने अपलोड होत असलेल्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ मजेदार असतात. तर काही थरारक असतात. सध्या असाच एक जगण्यासाठी कसरत करणारा व्हिडीओ व्हायरल आहे. या व्हिडीओमध्ये आपलं सावज पकडण्यासाठी वाघाचे बछडे आणि वाघ टपून बसलेले आहेत. तर दुसरीकडे आपला जीव वाचवण्यासाठी माकडाचे पिल्लू अटोकाट प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ( Tiger trying to catch Monkey and Monkey is struggling to save himself video goes viral)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोणाला मजेदार वाटतोय. तर हा व्हिडीओ पाहून काहींच्या अंगावर काटा उभा राहतोय. या व्हिडीओमध्ये माकडाचे पिल्लू झाडाच्या फांदीला लटकलेले दिसत आहे. माकडाचे पिल्लू ज्या झाडाच्या फांदीला लटकले आहे, त्याच्या खाली पाणी आहे. या पाण्यात वाघाचे बछडे आणि काही वाघ आहेत. माकडाचे हे पिल्लू कधी एकदाचे खाली पडते आणि आम्ही कधी एकदाचा त्याचा फडशा पाडू याची वाट हे वाघ पाहत आहेत. त्यासाठी माकडाचं लटकलेलं पिल्लू पकडण्यासाठी व्हिडीओतील वाघ हवेत झेप घेतायत.  दुसरीकडे वाघाने हवेत झेप घेताच फांदीला लटकलले माकडाचे पिल्लू पुन्हा फांदीवर चढण्यासाठी धडपडताना दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, जगण्या आणि मरणाचा हा खेळ काही लोकांना चांगलाच भावला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा व्हिडीओ पाहून माकडाच्या पिल्लाचा जगण्यासाठीचा संघर्ष अनेकांना आवडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला आतापर्यंत एकूण 11 नेटकऱ्यांनी पाहिले आहे. तर बाराशेपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.

इतर बातम्या :

एक नाही, दोन नाही, सतरावं मुल जन्माला घालण्याची तयारी, बाईची तऱ्हाच न्यारी !

वादळी वाऱ्याने चीनच्या प्रसिद्ध Glass bridge चं नुकसान, पर्यटक 330 फुटांवर लटकतानाचा फोटो

Video | गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर महिला पोलिसांचा धम्माल डान्स, व्हिडीओ व्हायरल

( Tiger trying to catch Monkey and Monkey is struggling to save himself video goes viral)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.