AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्याने चीनच्या प्रसिद्ध Glass bridge चं नुकसान, पर्यटक 330 फुटांवर लटकतानाचा फोटो

चीनच्या लोंगजिंग शहरात (Longjing City) बांधलेल्या काचेच्या ब्रिजवर शुक्रवारी ही दुर्घटना घडली (Glass bridge China shatters)

वादळी वाऱ्याने चीनच्या प्रसिद्ध Glass bridge चं नुकसान, पर्यटक 330 फुटांवर लटकतानाचा फोटो
Glass bridge China
| Updated on: May 10, 2021 | 11:58 AM
Share

बीजिंग : वादळी वाऱ्याने चीनचा प्रसिद्ध ग्लास ब्रिज (Glass bridge) ला धक्का पोहोचल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहिल्यानंतर पुलाचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. वाऱ्यामुळे ब्रिजच्या काही भागातील काचा उडाल्या. त्यावेळी ब्रिजवरुन चालणारा एक पर्यटक 330 फुटांवर लटकत होता. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचवले. (Glass bridge in China shatters after Heavy wind leaving tourist trapped partway across terrifying photo)

330 फूट उंचावर पर्यटक अडकला

‘द सन’च्या रिपोर्टनुसार ही घटना चीनच्या लोंगजिंग शहरात (Longjing City) बांधलेल्या काचेच्या ब्रिजवर घडली आहे. शुक्रवारी या परिसरात 90 किलोमीटर प्रतितास वेगाने तुफानी वारे वाहत होते. वाऱ्यामुळे ब्रिजच्या काही भागातील काचाही उडाल्या. यावेळी ब्रिजवर फिरायला आलेला पर्यटक वादळात अडकला. 330 फूट उंचावर असलेल्या ब्रिजच्या रेलिंगला पकडून जीव मुठीत घेऊन तो उभा होता.

घाबरलेल्या पर्यटकाचे समुपदेशन

काही वेळानंतर अग्निशमन दल, पोलिस आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकाची सुटका केली. सुरुवातीला त्याला रुग्णालयात नेण्यात आले. संबंधित पर्यटक भीतीमुळे प्रचंड तणावाखाली होता. त्यामुळे त्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी समुपदेशन केले.

कसा आहे ग्लास ब्रिज?

चीनमधील प्रसिद्ध ग्लास ब्रिज लोंगजिंग शहरातील पियान पर्वतावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये आहे. मोठ्या संख्येने पर्यटक तिथे फिरायला जातात. पूल पार करण्यासाठी लोकांना काचेच्या फरशीवरुन चालावे लागते. 330 फूट उंचावर असल्यामुळे काचेतून थेट खाली पाहताना अनेकांची भीतीने गाळण उडते. चीनच्या हुनान प्रांतात चांगचियाचिए शहरातही काचेचा ब्रिज आहे. त्याची लांबी 430 मीटर, तर रुंदी सहा मीटर आहे. (Glass bridge China shatters)

संबंधित बातम्या :

गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान हिरवा कपडा का वापरतात? जाणून घ्या कारण

Video | गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर महिला पोलिसांचा धम्माल डान्स, व्हिडीओ व्हायरल

(Glass bridge in China shatters after Heavy wind leaving tourist trapped partway across terrifying photo)

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.