AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Attack Iran : इस्रायलचा इस्फहानवर जबरदस्त AIR STRIKE, एका झटक्यात किती नुकसान? काय नष्ट केलं?

Israel Attack Iran : अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या घनघोर युद्धाचा आज 9 वा दिवस आहे. हे युद्ध आता Energy War मध्ये बदललय. संपूर्ण इराणच्या आकाशावर वर्चस्व गाजवण्यासाठी असे हल्ले आणखी वाढवणार आहे.

Israel Attack Iran :  इस्रायलचा इस्फहानवर जबरदस्त AIR STRIKE, एका झटक्यात किती नुकसान? काय नष्ट केलं?
Israel Airstrike On Iran
| Updated on: Mar 08, 2026 | 4:16 PM
Share

मिडिल ईस्ट युद्ध क्षेत्रातून अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायली एअरफोर्सने शनिवारी इराणच्या इस्फहान एअरपोर्टवर जोरदार हवाई हल्ला केला. या स्ट्राइकमध्ये इराणी एअरफोर्सचे F-14 फायटर जेट्स जागीच उद्धवस्त करण्यात आल्याचा दावा इस्रायली एअरफोर्सने केला आहे. इराणी सैन्याचा पायाभूत ढांचा नष्ट करणं हा शनिवारच्या व्यापक हल्ल्यामागचा उद्देश होता, असं IDF कडून सांगण्यात आलं. फक्त इराणी फायटर जेट्सच नाही, तर इस्रायली विमानांना धोका उत्पन्न करणारे रडार आणि एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यात आली. शुक्रवारी तेहरानच्या मेहराबाद एअरपोर्टवर स्ट्राइक करण्यात आला. त्यानंतर इस्फहान येथे हल्ला झाला. मेहराबादच्या स्ट्राइकमध्ये कुद्स फोर्सची 16 विमानं नष्ट केल्याचा दावा करण्यात आला. संपूर्ण इराणच्या आकाशावर वर्चस्व गाजवण्यासाठी असे हल्ले आणखी वाढवणार आहे, असं इस्रायलने स्पष्ट केलय.

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या घनघोर युद्धाचा आज 9 वा दिवस आहे. हे युद्ध आता Energy War मध्ये बदललय. अमेरिकी-इस्रायली एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी आज सकाळी तेहरानमधील प्रमुख तेल डेपोंना लक्ष्य करुन ते नष्ट केले. हे हल्ले इतके जबरदस्त होते की, अनेक किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू आले. दूर-दूरपर्यंत धुराचे ढग दिसत होते.

सलग 6 महिने युद्ध लढण्याची क्षमता

इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने आक्रमकपणे एकाचवेळी 5 देशांवर हवाई हल्ले केले. इस्रायल सोबत कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन आणि संयुक्त अबर अमिरातीवर इराणने हे हल्ले केले. इराणने अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिलाय की, त्यांच्याकडे सलग 6 महिने युद्ध लढण्याची क्षमता आहे.

याचं प्लांटवर हल्ले होऊ शकतात

आखाती देशांमधील ही लढाई आता पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचू शकते. आखाती देशातील लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी समुद्री पाण्यावर अवलंबून आहे. समुद्राचं खारं पाणी डीसॅलिनेशन प्लांटमधून पिण्यायोग्य बनवलं जातं. आता याचं प्लांटवर हल्ले होऊ शकतात. इराणने आमच्या अशाच एका प्लांटवर हल्ला केलाय असा दावा बहरीनने केला आहे.

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.