AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final : भारताच्या प्लेइंग 11 मधून अखेर या खेळाडूचा पत्ता कट! नेटमध्ये या खेळाडूची झाली चाचणी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल होईल आणि प्लेइंग 11 मध्ये कोण असेल याबाबत कन्फर्म होईल. असं असताना भारतीय संघात एक बदल निश्चित असल्याचं दिसत आहे.

IND vs NZ Final : भारताच्या प्लेइंग 11 मधून अखेर या खेळाडूचा पत्ता कट! नेटमध्ये या खेळाडूची झाली चाचणी
IND vs NZ Final : भारताच्या प्लेइंग 11 मधून अखेर या खेळाडूचा पत्ता कट! नेटमध्ये या खेळाडूची झाली चाचणी Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 08, 2026 | 4:19 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर भारताने एन्ट्री मारली आहे. या स्पर्धेत भारताने सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकमेव सामना गमवला आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची उत्सुकता आहे. कारण इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने 253 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. तरीही इंग्लंडने विजयाच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लागला आणि भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. त्यामुळे अंतिम सामन्यात काही बदल दिग्गज क्रिकेटपटूंनी सुचवले होते. त्यापैकी एक बदल आता निश्चित मानला जात आहे. कारण 7 मार्चला भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव केला. यावेळी सराव शिबिरात एक बदल दिसून आला. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये एक बदल निश्चित मानला जात आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्य भारतीय संघाने सराव केला. यावेळी सराव शिबिरात वरूण चक्रवर्ती दिसला नाही. त्याच्याऐवजी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीचा सामना रिंकु सिंहने केला. इतकंच काय तर कुलदीप यादवसोबत तिलक वर्मानेही गोलंदाजी केली. हा सराव वरूण चक्रवर्ती ड्रिंक्स काउंटवर बसून पाहात होता. पण त्यापूर्वी वरूण चक्रवर्तीने मोर्ने मॉर्केलच्या मार्गदर्शनाखाली सिंगल स्टंपसमोर गोलंदाजी केली. तसेच त्याच्यासोबत चर्चाही केली. त्यामुळे वरूणच्या कुलदीप प्लेइंग 11 मध्ये दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादवला वरूण चक्रवर्तीच्या फॉर्मबाबत काहीच चिंता नाही. पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं की, त्याला माहिती आहे की चांगली कामगिरी कशी करायची ते..वरुण चक्रवर्ती साखळी फेरीत प्रभावी ठरला होता. पण सुपर 8 फेरीत त्याची लय पूर्णपणे बिघडल्याचं दिसून आलं. सुपर 8 फेरीतील 3 सामने आणि उपांत्य फेरीत वरूण चक्रवर्तीने खोऱ्याने धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाचे विजय खूपच कठीण झाले. सुदैवाने जसप्रीत बुमराहने सावरलं. अन्यथा चित्र काही वेगळं असतं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल