EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जाचा ईएमआय भरणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करता तो 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नसून ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच हप्ते भरावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आर्थिक वर्ष 2026-27 च्या तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यानंतर हा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, मध्य पूर्वेतील वाढते जागतिक तणाव, महागाईची परिस्थिती आणि आर्थिक वाढ यांचा विचार करून पतधोरण समितीने (MPC) रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांवरील ईएमआयमध्ये कोणतीही वाढ किंवा घट होणार नाही. त्यामुळे लाखो कर्जदारांना दिलासा मिळाला असून, सध्याचे हप्ते कायम राहणार आहेत. या बैठकीत रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात ठेवणे आणि देशाच्या आर्थिक वाढीला चालना देणे यावर विशेष भर दिला.
दरम्यान, पतधोरण समितीच्या निर्णयापूर्वी देशांतर्गत शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण दिसून आले. आरबीआयने शेवटचा रेपो दर ऑक्टोबर 2025 मध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कमी केला होता. त्यानंतर डिसेंबर, फेब्रुवारी, एप्रिल, जून आणि आता ऑगस्टच्या पतधोरण आढाव्यातही रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महागाईवरील दबाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक वाढीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने यावेळी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे मानले जात असून, आगामी काळातील आर्थिक परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Published on: Aug 05, 2026 12:39 PM
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..