झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा ठरविण्यासाठी संभाजीनगरमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी CJP ची टीम काल रात्री दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली होती. आज या दोन दिवसीय बैठकीबबात अभिजीत दिपके यांनी माहिती दिली तसेच झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोनलाबाबतही वक्तव्य केलं.

राजधानी दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा काय असेल, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. अशातच आता पार्टीची पुढील दिशा ठरविण्यासाठी CJP ने संभाजीनगरमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी कॉकरोच जनता पार्टीची टीम दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. आशुतोष रांका, सौरव दास त्यांच्यासह इतर सहकारी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या बैठकीबाबत सौरव दास यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
या प्रकरणी अभिजीत दीपके यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही देशभर आमच्या पार्टीचा प्रभाव कसा वाढवता येईल, याबाबत चर्चा करणार आहोत. तसेच सर्व राज्यांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा आवाज बनू, असे विधान त्यांनी केले आहे. सध्या झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्याबाबत प्रश्न विचारताच अभिजीत दीपके यांनी पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्या आंदोलनात सहभागी होण्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
Published on: Aug 05, 2026 12:48 PM
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले