AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला खोट्या गुन्ह्यात अडकवले; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; त्या प्रकरणातील आयोजक थेट कॅमेऱ्यासमोर

2009च्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या प्रकरणी वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात खटला दाखल केला. आता याप्रकरणी जबाब नोंदवला जात आहे.

मला खोट्या गुन्ह्यात अडकवले; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; त्या प्रकरणातील आयोजक थेट कॅमेऱ्यासमोर
उद्धव ठाकरेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 12:57 PM
Share

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी जबाब नोंदवला आहे. कल्याण सत्र न्यायालयात उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे हजर होते. सिविल मॅजिस्ट्रेट संतोष आगे यांच्या दालनात उद्धव ठाकरे यांनी आपला जबाब नोंदवला आहे. या वेळी शिंदे गटाचे वकील देखील न्यायालयात हजर होते. तसेच आयोजक रमाकांत देवळेकर यांनी मोठे आरोप केले आहेत.

313 प्रमाणे उद्धव ठाकरे यांचा स्टेटमेंट रिपोर्ट केलेला आहे. 30 ते 35 प्रश्न विचारले आणि कोर्टाच्या पुराव्या संदर्भात ते प्रश्न असल्याने आम्ही ते सांगू शकत नाही. आम्ही बचावासाठी तो आणलेला आहे. त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगू शकत नाही. आज उद्धव ठाकरे यांचा स्टेटमेंट झालं आहे. त्याचप्रमाणे उद्या एकनाथ शिंदे यांचा व्हीसीद्वारे स्टेटमेंट घेण्यात येणार आहे. तर स आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे फिजिकली न्यायालयात हजर राहणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी व्हिसीमध्ये सांगितले की, या प्रकरणातील सर्व गोष्टीची आम्हाला माहिती नाहीत, असं आनंद परांजपे यांच्या वकिलांनी सांगितलं. मला या प्रकरणातील खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा जबाब उद्धव ठाकरेंनी नोंदवल्याचंही वकिलांनी सांगितलं.

शिंदे गटाचे आयोजक रमाकांत देवळेकर यांनी म्हटले की, 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. या सभेचे आयोजन मी केलं होतं. पूर्ण परवानगी देखील काढल्या. त्या सभेत उद्धव ठाकरे आले. भाषण सुरू झाल्यानंतर ती सीडी दाखवण्यात आली. सीडी सगळ्यांनी पाहिल्यानंतर आम्ही निघून गेलो आणि त्याच रात्री आमच्यावरती गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पोलिसांनी बोलून त्यांचे जवाब नोंदवले. त्यावेळेला ही सांगितलं होतं की, मी आयोजक होतो. मात्र या सीडीबाबत मला काही माहिती नाही. तर आनंद परांजपे यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, मला पोस्टलने बंद पाकीट आलं होतं. त्यामध्ये एक मजकूर लिहून पत्र आलं होतं. ते त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं आणि त्यानंतर शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. यानंतर त्या दोघांची देखील स्टेटमेंट झालेली आहे. उद्या विसीद्वारे आम्ही दोघजण या ठिकाणी हजर राहणार आणि आमचा जवाब नोंदवला.

आनंद परांजपे यांचे वकील म्हणाले की, युक्तिवाद झाला नाही. 313 प्रमाणे उद्धव ठाकरे यांची साक्ष घेण्यात आली आहे. उद्या त्याचप्रमाणे इतर एकनाथ शदे व अन्य दोन जणांची साक्ष होईल. त्यानंतर पुढच्या तारखेपर्यंत हीच सुनावणी जाणार. उद्धव ठाकरे यांना 30 प्रश्न विचारले गेले. त्यांच्या माहितीप्रमाणे सदरची केस ही खोटी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी कोणत्याही प्रकारची मानहानी केली नव्हती. त्यामुळे खोट्या केसमध्ये अडकवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर सर्वांचे जबाब उद्या घेणार आहेत. त्यात एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे व आनंद परांजपे आणि देवळेकर वैयक्तिक हजर राहणार आहेत. त्यांची देखील 313 प्रमाणे साक्ष होणार आहे. सदर प्रकरणांमध्ये युक्तीवाद झाला नाही. युक्तिवाद झाल्यानंतर या सर्व प्रकरणाचा खुलासा होणार आहे. या प्रकरणांमध्ये एकूण 10 साक्षीदार, दोन तपासणी अधिकारी, पंच आणि काही साक्षीदारांची साक्ष घेतली आहे. कारण फिर्यादी स्वतः हयात नाहीत.

नेमकं प्रकरण काय आहे?

2009च्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. आता या प्रकरणी जबाब नोंदवले जात आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?