AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीट पेपरफुटीचा दणका, थेट नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, खासदारांना युवकांबद्दल दिला कानमंत्र..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच खासदारांना मोठा कानमंत्र दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने भाजपाला फटका बसला. यादरम्याचन नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

नीट पेपरफुटीचा दणका, थेट नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, खासदारांना युवकांबद्दल दिला कानमंत्र..
Narendra Modi
| Updated on: Aug 05, 2026 | 12:55 PM
Share

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांना मोठा कानमंत्र दिला. बुधवारी एनडीएच्या 37 खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही गोष्टींवर थेटपणे बोलताना दिसले. त्यांनी आपले अनुभव देखील यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, छोटीशी चूकही खूप मोठी समस्या बनू शकते. खासदारांनी चुकीचा गोष्टीमध्ये पकडण्यापासून वाचले पाहिजे. अयोग्य पाहुणचार स्वीकारण्याबाबत सल्ला दिला. नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटले की, आपले लेटरहेड किंवा सही चुकीच्या लोकांच्या हाती पडू न देण्याबाबत खूप जास्त सावध राहिले पाहिजे. राजकारणात विश्वास निर्माण करणे कठीण असते. पण गमवायला काहीच वेळ लागत नाही. संसदेत जास्तीत जास्त उपस्थित राहणे आणि संवाद वाढवला पाहिजे.

फक्त संसदेत उपस्थित राहणे हेच काम नसते तर जास्तीत जास्त लोकांमध्ये जाणे, त्यांच्यासोबत संवाद साधणेही महत्वाचे असते. जर संसदेत विरोधकांकडून काही टीका झाली तर त्यांच्यासोबत लगेचच भांडणे करण्याऐवजी त्यांना समजून सांगा. यादरम्यान नरेंद्र मोदी यांना लोकांचे मन जिंकण्यावर अधिक भर दिला. लोकांसोबत संवाद साधा आणि त्यांचे मन जिंका असेही त्यांनी म्हटले.

युवकांबद्दलही त्यांनी खास संदेश दिला. त्यांनी म्हटले की, युवकांचे ऐकले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, तरच समाधान मिळेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकार अधिक सर्तक झाले. युवकांचे प्रश्न जाणून घ्या त्याच्यासोबत संवाद वाढवा, असेही थेटपणे नरेंद्र मोदी यांनी खासदारांना म्हटले. मतदार संघात फिरण्याच्याही सूचना दिल्या.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे सरकारसाठी मोठा झटका आहे. 12 वर्षातील हा पहिला राजीनामा ठरला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सरकारला एक मोठ फटका बसला. कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन देशभरात उभे केले. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी पहिल्या दिवसापासूनच आग्रही होती. शेवटी सरकारवरील दबाव प्रचंड वाढला आणि त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी