AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gungi Gudiya Remark NCP Protest : गुंगी गुडियावरून वातावरण तापलं, NCP आक्रमक, मंत्रालयासमोर आंदोलन

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' म्हटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आक्रमक झाली आहे. नाशिक, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. मुंबईत मंत्रालयासमोर मूक आंदोलन करत काँग्रेसने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. 'गुंगी नाही, वादळ आहे' अशा घोषणांनी परिसर दणाणला. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीव्र पडसाद उमटत आहेत.

Gungi Gudiya Remark NCP Protest : गुंगी गुडियावरून वातावरण तापलं, NCP आक्रमक, मंत्रालयासमोर आंदोलन
सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, मंत्रालयासमोर आंदोलन
| Updated on: Aug 05, 2026 | 1:00 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणत काँग्रेसने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र हे विधान आता काँग्रेसला महागात पडत असून एनसीपीचे नेते कार्यकर्ते प्रचंड भडकले आहेत. नाशिक, पुण्यासह, मुंबईत तसेच राज्यभरात या विधानाचे पडसाद उमटले असून अनेक ठिकाणी आंदोलन झाली. मुंबईतही यावरून एनसीपी आक्रमक झाली असून आज दुपारी मंत्रालयासमोर एनसीपीने आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्य कर्त्यांकडून मंत्रालय च्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी च्या पुतळ्या जवळ मूक आंदोलन सुरू आहे. पोलिसांकडून मात्र या आंदोलनाला परवानगी मिळालेली नाहीये. मात्र तरीही संतापलेले कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या प्रमाणात मंत्रालयाजवळ जमलेले असून वातावरण थोडं तापलेलं दिसलं. पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना रोखण्यात आलं.

घोषणांनी दणाणला मंत्रालयाचा परिसर

यावेळी उपस्थित कार्यकर्ते, आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्याचं पहायला मिळालं. ‘सुनेत्रा वहिनी अगा है, बाकी सब भंगार है..’ ‘ गुंगी नहीं है , आँधी है.. आँधी नहीं तूफान आहे’, तसेच ‘ सुनेत्रा वहिनी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा विविध घोषणांनी मंत्रालयाजवळचा परिसर दणाणून गेला होता.

पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथे आले आहेत, अनेक पदाधिकारी उपस्थित असून महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे सर्व जमलो आहोत. त्यांनी माफी मागितल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार नाही. आम्ही महात्मा गांधींच्या चरणांवर पुष्पहार अर्पण करून, काँग्रेसवाल्यांना सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना करणार आहो, असं एनसीपीच्या नेत्यांनी सांगितलं.

तर राष्ट्रवादीच्या नेत्या, सना मलिक यांही आंदोलनस्थळी उपस्थित होत्या, त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. आपल्या पक्षातील कोणावरही जर टीका केली, तर मोर्चा काढण्याचा किंवा आंदोलनाचा अधिकारा आम्हाला संविधानानने दिला आहे. काँग्रेसने जाहीर माफी मागितली पाहिजे, हीच आमची मागणी आहे, असं त्या म्हणाल्या. आम्ही फक्त मूक आंदोलन करणार आहोत, आम्ही शांतपणे जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहोत, कायदा कोणीच हातात घेणार नाही, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...