Shiv Thakre: 20 वर्षांपासून जे लोक काम करत आहेत त्यांनी… शिव ठाकरेने माधुरी दीक्षितला बोलून दाखवली इंडस्ट्रीची काळी बाजू
Shiv Thakre On Film Industry: शिव ठाकरेने कोण होणार करोडपती या शोमध्ये गौतमी पाटीलसोबत हजेरी लावली होती. या शोमध्ये माधुरी दीक्षितने शिवला एक प्रश्न विचारला असता त्याने काय उत्तर दिलं ते पाहा...

Shiv Thakre On Industry: छोट्या पडद्यावरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात आता शिव ठाकरे आणि गौतमी पाटीलने उपस्थिती लावली होती. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. शिव ठाकरे आणि गौतमी पाटील यांची जोडी खरंतर अनपेक्षित होती पण त्यांना एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. आता या कार्यक्रमात माधुरी दीक्षितने त्यांना अनेक प्रश्न विचारले ज्यांची उत्तरे त्यांनीही प्रामाणिकपणे दिली.
रिॲलिटी शोजमधील स्पर्धा आणि लोकांकडून येणाऱ्या विविध प्रकारच्या कमेंट्स याविषयी माधुरीने प्रश्न विचारला असता शिवने आपले परखड मत मांडले. चित्रपट आणि टीव्ही विश्वाबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला की, “या क्षेत्रात वीस-वीस वर्षे काम करणारे दिग्गज आधीच आहेत, अशा वातावरणात काम करत असताना वेगवेगळ्या स्वभावांची माणसे कशी हाताळयची हे मला शिकता आले. जर एखादा माणूस स्वत:ला पूर्णपणे निष्पाप दाखवून इथे टिकण्याचा प्रयत्न करेल, तर ही इंडस्ट्री त्याला ओळखही दाखवणार नाही. काम मिळवण्यासाठी आणि स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये थोडे हुशार आणि परिस्थितीनुसार वागणे आवश्यक असते, असे मत त्याने यावेळी मांडले.
“अनेक रिॲलिटी शोज गावल्यानंतर काही लोक आजही प्रश्न विचारतात की, इतका काळ या इंडस्ट्रीमध्ये राहूनही तू अजून एवढा साधा कसा काय? यावर उत्तर देताना शिव ठाकरे म्हणाला की, ” माणसाचे मूळ व्यक्तिमत्व कधीच बदलता येत नाही, यशाची हवा डोक्यात न जाऊ देण्याचे संपूर्ण श्रेय मी आपल्या कुटुंबाला देतो. आज या शोचे शूटिंग सुरु होण्यापूर्वीच मला आईचा फोन आला आणि तिने मला थेट गॅस सिलिंडर रिफिल बुक करायला सांगितले, अशा साध्या कौटुंबिक जबाबदाऱ्या माणसाला हवेत उडू न देता जमिनीवर घट्ट पाय रोवून ठेवायला मला भाग पडतात. ” असं शिवने बोलून दाखवलं
