AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Payal Zambre: आयटी इंजिनिअर, शांत स्वभाव… पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या सुनेने संपवलं जीवन

Payal Zambre Case: पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध उद्योगपत्याच्या आयटी इंजिनिअर सुनेने टोकाचे पाऊल उचलले आहे. 29 वर्षीय महिलेच्या या निर्णयामुळे पुण्यात पुन्हा खळबळ माजली आहे.

Payal Zambre: आयटी इंजिनिअर, शांत स्वभाव... पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या सुनेने संपवलं जीवन
Payal ZambareImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 7:42 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता मुकंदनगर परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने राहत्या घरात स्वत:ला संपवले आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ माजली आहे. ही महिला एका प्रसिद्ध उद्योगपत्याची सून आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पायल झांबरेच्या निधानानंतर माहेरचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी सासरच्या घरावर, पुण्यातील महर्षी नगर परिसरात असलेल्या झांबरे पॅलेसवर हल्ला करत तोडफोड केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पायलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पती, सासू, सारे आणि नणदेला अटक

पायलने इतके टोकाचे पाऊल उचलल्यानंतर या प्रकरणी पायलचा पती अक्षय झांबरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पायलचे सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. पायलच्या माहेरच्या लोकांनी झांबरे कुटुंबावर अनेक आरोप केले आहे. माहेराहून पैसे आणि सोने आणण्याचा तगादा झांबरे कुटुंबियांनी मुलीच्या मागे लावल्याचे सांगितले. तसेच सासरच्या जाचाला कंटाळून पायलने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे देखील पायलच्या कुटुंबियांनी सांगितले. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

माहरेच्यांनी केले झांबरे परिवारावर आरोप

पायल पवार ही पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक झांबरे पॅलेसचे मालक झांबरे यांची सून आहे. मुलीच्या निधनानंतर पवार कुटुंबिय संतप्त झाले आहे. मुलीचा माहेरच्या लोकांनी खून केला असल्याचे आरोप केला आहे. पायल यांच्या सासरच्या लोकांकडून सोनं आणि पैशांसाठी त्यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता, असा आरोप पायलच्या माहेरच्यांनी केला आहे. पायल या उच्चशिक्षित आणि अत्यंत शांत स्वभावाच्या होत्या, त्या कोणत्याही परिस्थितीत असे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत असा ठाम दावा कुटुंबियांनी केला आहे.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद