सोशल मीडियावर भयंकर ट्रोल, धर्मही काढला… पण काहीच बोलली नाही; सोनाक्षी सिन्हा कुठे आहे? पहिला फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्याकाही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील सोनाक्षीला ट्रोल केलं जात असताना तिचा धर्म देखील काढण्यात आला... अशात अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे सोनाक्षी कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या कुटुंबासोबत भूतान ट्रिपचा आनंद लूटत आहे. अभिनेत्रीने ट्रिपचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले असून, ते फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सोनाक्षी पती आणि अभिनेका झहीर इक्बाल याच्यासोबत खास वेळ व्यतीत करताना दिसत आहे. या ट्रिपमध्ये सोनाक्षी आणि झहीर यांच्यासोबत अभिनेत्रीतं नणं सनम रतनसी देखील दिसत आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सोनाक्षी म्हणते, ‘कुटुंबियासोबत खास वेळ त्यासोबत डोंगर आणि भूतान येथीस झेंड्यांचे इमोजी अभिनेत्रीने पोस्ट केले आहेत.’, त्यानंतर झहीर याने देखील सोशल मीडिया अकाउंटवर सुट्ट्यांचे फोटो पोस्ट केले आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे त्यांच्या आई – वडिलांसोबत आणि बहिणीसोबत भूतानच्या सहलीवर गेले आहेत. या फोटोंमध्ये, उंच पर्वत, वाहत्या नद्या आणि ढगांनी वेढलेल्या हिरव्यागार दऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सोनाक्षी आपल्या कुटुंबासोबत आनंदात दिसत आहे. झहीरने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कुटुंब एकत्र शांत आणि आनंदी क्षण अनुभवताना दिसत आहे.
View this post on Instagram
सोनाक्षीने ट्रोलिंगचा केलाय सामना…
सोनाक्षी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचं समर्थन केलं होतं. अभिनेत्रीने सोशल मीडियावर आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट केलेले. एवढंच नाही तर, माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, तिने सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याचं कौतुक करणारा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्या अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला; काही लोकांनी तिला पाठिंबा दिला, तर काहींनी तिला विरोध केला.
अभिनेत्री कंगना राणौत यांनी साधला निशाणा…
सोशल मीडियावर CJP आंदोलन चर्चेत असताना, भाजप खासदार कंगना राणौत यांनी सोनाक्षी हिचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला… नेटकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगना यांनी पोस्ट सोनाक्षी हिच्यासाठीच शेअर केलेली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंगना म्हणालेल्या, ‘सध्या अनेक फेक न्यूज सुर आहे. माझ्या विरोधात देखील अनेक खोट्या बातम्या पसरत आहेत. मी कधीच कोणाच्या शरीराची थट्टा करत नाही. पण मी एक अशी अभिनेत्री पाहिली आहे, जी सध्या पाकिटमारासारखे कपडे घालत आहे. हाफ पँट आणि उलटी टोपी अभिनेत्री घालते आणि आंदोलन करणाऱ्यांचं समर्थन करते… ‘
पुढे कंगना म्हणाल्या, ‘मला नेहमीच असं वाटलं आहे की, नात्यात तुम्ही ज्या प्रकारे कपडे घालता, त्यातून तुमच्या भावना थेट दिसून येतात. माझ्या प्रिय अभिनेत्री, जर तुझ्या जोडीदारामुळे तुला एखाद्या खिसेकापूसारखं वाटत असेल, तर मला खरोखरच वाईट वाटतं. तू पूर्वी किती छान कपडे घालायचीस आणि किती छान बोलायची आता तुला काय झालं आहे? अर्थात, तुला तुझं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच, पण तू तुझ्या स्टायलिंगमध्ये नक्कीच सुधारणा करू शकतेस. तुला काही मदत हवी असल्यास, मी नेहमीच तुझ्यासाठी इथे आहे.’, असं देखील कंगना म्हणाल्या.
