Bhandara Health | भंडाऱ्यात बुरशीयुक्त जंतनाशक गोळ्या! विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, खरबीत प्रकरण उघडकीस

| Updated on: Apr 26, 2022 | 3:51 PM

भंडाऱ्यात आरोग्य विभागाद्वारे विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला. जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र शिक्षकांचा सतर्कतेने वेळीच हा प्रकार लक्षात आला. मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे ह्या गोळ्या जंतुनाशक की जंतुपोषक हाच सवाल येथील संतप्त पालक विचारत आहेत.

Bhandara Health | भंडाऱ्यात बुरशीयुक्त जंतनाशक गोळ्या! विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, खरबीत प्रकरण उघडकीस
भंडारा जिल्ह्यात बुरशीयुक्त जंतनाशक गोळ्या आढळल्या.
Image Credit source: tv 9
Follow us on

भंडारा : जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त (National Deworming Day) 1 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम सोमवारपासून सुरू झाली आहे. भंडारा तालुक्यातील खरबी येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे काल सकाळी 11 वाजता जंतनाशक गोळ्या वितरण सुरू केले होते. या शाळेत 450 गोळ्या वितरणासाठी आरोग्य विभागाने दिल्या होत्या. अकराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना गोळ्या वितरित करीत असताना एका स्ट्रिपमध्ये काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. मुख्याध्यापकाने (Headmaster) त्वरित गोळ्या वितरण थांबवून यांची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला (Department of Health) दिली. विशेष म्हणजे या बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून सात विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्याचे स्पष्ट होताच त्यांची विशेष काळजी घेण्यात सुरुवात झाली. त्या बॉक्समधील अनेक स्ट्रिपमध्ये बुरशीयुक्त गोळ्या आढळल्या.

काही विद्यार्थ्यांनी खाल्या गोळ्या

भंडारा आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या या जीवाशी खेळण्याचा प्रकारामुळे पालक मात्र कमालीचे संतप्त झाले आहेत. अशी प्रतिक्रिया देवराम वाडिभस्मे व मुख्याध्यापक सुधाकर देशमुख यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी तत्काळ आपल्या चमूसह दाखल झाले. त्यांनी चौकशी केली असता बॅच नं. एईटी 216 मध्ये तीन गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. लागलीच त्या गोळ्या ताब्यात घेत बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून ज्या सात विद्यार्थ्यांना गोळ्या खाल्ल्या. त्यांची तपासणी करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर आरोग्य विभाग वॉच ठेवून आहे. अशी माहिती खरबी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश हेडाऊ यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

भंडाऱ्यात आरोग्य विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला. जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र शिक्षकांचा सतर्कतेने वेळीच हा प्रकार लक्षात आला. मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे ह्या गोळ्या जंतुनाशक की जंतुपोषक हाच सवाल येथील संतप्त पालक विचारत आहेत. गोळ्या खाणाऱ्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सुदैवाने कोणतीही लक्षण आढळून आली नाही. मात्र ही घटना केवळ एका स्ट्रिपबाबत घडली नाही. इतर ही स्ट्रिपमध्ये अश्या बुरशीयुक्त गोळ्या आढळून आल्यात. नक्की याबाबत योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.