माज उतरला, वजन घटलं, पाच आजारांनी घेरलं… अटक होताच भोंदू खरातची अशी झाली हालत; फोटो व्हायरल

लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झालेल्या भोंदू अशोक खरातबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटी चौकशीत त्याचे अनेक कृष्णकृत्य उघड झाले आहेत. एकेकाळी ऐषारामी जीवन जगणाऱ्या खरातचे वजन घटले असून, विविध आजार आणि पोलिसांच्या चौकशीमुळे तो प्रचंड तणावात आहे. त्याचे भविष्य आता अंधारात आहे.

माज उतरला, वजन घटलं, पाच आजारांनी घेरलं... अटक होताच भोंदू खरातची अशी झाली हालत; फोटो व्हायरल
अशोक खरात केस
| Updated on: Apr 04, 2026 | 11:35 AM

धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांना फवून, त्यांना भूलवून त्यांच लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat) गेल्या महिन्यात, 18 मार्च रोजी अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ताठ मानेने फिरणाऱ्या, इतरांचं भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातचं स्वत:च भविष्य आता अंधारात आहे. अटक झाल्यापासून गजआड असलेल्या खरातची पोलिस कसून चौकशी करत असून एसआयटीकडे या प्रकरणाचा तपास सोवण्यात आला आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती, खुलासे समोर येत असून हे प्रकरण फक्त महिलांवरील लैंगिक अत्याचारापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर त्यांच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडीओ बनवणं, त्यांना ब्लॅकमेल करून, धमकावून वारंवार अत्याचार करणं, तसेच ऑफीसमध्ये आलेल्या इतर भक्तांना फसवणं, त्यांची आर्थिक लुबाडणूक करणं असे अनेक काळे कारनामे खरातच्या नावावर आहेत.

17 -18 दिवसांपूर्वी खुला फिरणारा हा भोंदू खरात आज गजाआड तिष्ठत असून अत्यंत आलिशान आयुष्य जगणाऱ्या खरातवर आता छोट्याशा कोठडीत रोजचा दिवस काढण्याची वेळ आली आहे. तो अत्यंत हलाखीत जगतोय. त्याचं वजन कमी झालं, तणाव वाढलाय आणि विविध आजारांमुळे तो खंगून गेल्याची माहिती समोर आली आहे.

भोंदू खरातचे कोठडीत हाल

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू खरात हा सध्या गजाआड असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यातच खरातला विविध आजार, व्याधी झाल्यामुळे त्याचं शरीर आतून पोखरलं गेलं आहे. खरातला पाच आजार झाले असून सारखं बर वाटत नसल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. आजारांमुळे तो औषध-गोळ्या घेत आहे, मात्र दुसरीकडे पोलिसांच दट्ट्या, सततची तौकशी यामुळे तो प्रचंड तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.

वजनही झालं कमी

एवढंच नव्हे तर या सगळ्या गोष्टींमुळे खरातचं वजनत 6-7 किलो कमी झाल्याचं समजतं. 18 मार्चला अटक केल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याचं वजन 79 किलो होतं, मात्र आत त्याच्या वजनात बरीच घट झाल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरच त्याची प्रकृती साथ देत नसल्याचं समोर आलं आहे.

आजारामुळे औषधांचा मारा आणि दुसरीकडे चौकशीसाठी पोलिसांचा ससेमिरा अशा खिंडीत खरात सापजला असून त्याचीच दुष्कृत्य त्याला महागात पडत असल्याचं दिसून येत आहे. खरातचे एकेक कारनामे, त्याने लोकांना फसवण्यासाठी केलेल्या क्लुप्त्या ऐकून पोलीस, तपास अधिकारीही चक्रावले आहेत. त्यातच खरातला काही वर्षांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आला होता, तेव्हा त्याच्यावर उपचार झाले होते, मात्र याचा फटका त्याला आजही बसला असून एका हाताची हालचाल नीट होत नसल्याचे समजते.

 

Follow Us