कोरोना व्हायरसच्या धास्तीनं महाबळेश्वर ओस, स्थानिक व्यावसायिकांना कोट्यावधींचा फटका

| Updated on: Mar 16, 2020 | 4:31 PM

थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे (Corona Effect on Mahabaleshwar tourism ). कोरोनाच्या भीतीने महाबळेश्वर ओस पडलं आहे.

कोरोना व्हायरसच्या धास्तीनं महाबळेश्वर ओस, स्थानिक व्यावसायिकांना कोट्यावधींचा फटका
Follow us on

सातारा : थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे (Corona Effect on Mahabaleshwar tourism ). कोरोनाच्या भीतीने महाबळेश्वर ओस पडलं आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायांवर याचा मोठा परिणाम झाला असून व्यावसायिकांना कोट्यावधींचा फटका बसला आहे.

महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये लाखोच्या संख्येने देश परदेशातून पर्यटक दाखल होत असतात. मात्र गेल्या 10 दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरसचा भारतातील वाढता संसर्ग. देशभरातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. यानंतर कोरोना व्हायरसची धास्ती घेतलेल्या पर्यटकांनी महाबळेश्वरकडे पाठ फिरवली आहे. वेण्णा लेक बोटचे व्यवस्थापन शरद मस्के यांनी याविषयी माहिती दिली.

कोरानाच्या धास्तीमुळे महाबळेश्वरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला. कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. महाबळेश्वरमधील मुख्य मार्केटच्या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मार्केटसह वेण्णालेक आणि पाचगणी टेबल लॅण्डवर पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.

महाबळेश्वरमधील हॉटेल, टॅक्सी व्यावसायिक, स्ट्रॉबेरी विकणार्‍या शेतकर्‍यांवर तर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी आणि महाबळेश्वर नगरपालिकेने पर्यटक आणि नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन केलं आहे. नगरसेवक कुमार शिंदे यांनी पालिकेकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेचीही माहिती दिली.

महाबळेश्वरमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पर्यटकांनी घाबरू नये असं आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही तुरळक पर्यटक महाबळेश्वरला फिरण्यासाठी येत आहेत. वर्षभरात 20 लाखाहून अधिक पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात.

मात्र, गेल्या 10 दिवसात मोठ्या संख्येने पर्यटकांमध्ये घट पहायला मिळत आहे. यामुळे कोट्यावधींची उलाढाल असणाऱ्या महाबळेश्वरचा व्यवसाय ठप्प झाला आहे. याचा सर्वाधिक फटका पर्यटनाला बसला आहे.

संबंधित बातम्या:

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट

Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

Corona Effect on Mahabaleshwar tourism