Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात महाराष्ट्रात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्यावर पोहोचली (Corona Virus Cases Crosses 100) आहे. महाराष्ट्रात काल आणखी पाच कोरोना संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96 वरुन 101 वर पोहोचली आहे. या जीवघेण्या (Corona Virus Cases Crosses 100) विषाणूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता केंद्र सरकारने कोविड-19 ला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलं आहे. तर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क देशांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोरोना संकटावर चर्चा करतील.

हेही वाचा : CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

महाराष्ट्रात आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण

देशात पहिले कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96 होती. मात्र, शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात महाराष्ट्रात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. या पाचपैकी चारजण हे दुबईला गेले होते तर पाचवी व्यक्ती ही थायलंडला गेली होती. (Corona Virus Cases Crosses 100) त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 26 वरुन 31 झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 15
  • मुंबई – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 2
  • नवी मुंबई – 2
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1

पाकिस्तानी सीमा सील केली जाईल

केंद्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाच (Corona Virus Cases Crosses 100) शेजारी देशांना लागून असलेल्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावर कारलवाई करत भारत-नेपाळ, भारत-बांग्लादेश, भारत-भूटान, भारत-म्यानमार सीमा सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई 14 मार्चला रात्री 12 वाजता करण्यात आली. तर 15 मार्च म्हणजेच आज रात्री 12 वाजेपासून पाकिस्तानी सीमाही सील करण्यात येईल. आता या सीमांवरुन प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

करतारपूर कॉरिडोरही बंद होणार

आज रात्रीपासून करतारपूर साहिब कॉरिडोरलाही बंद करण्यात येईल. नोव्हेंबर 2019 मध्ये खले करण्यात आलेल्या करतारपूर कॉरिडोरमधून दररोज 650 ते 800 लोक करतारपूर साहिबचे दर्शन करण्यासाठी जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्याला पाहता ही संख्या घटली आहे. सध्या (Corona Virus Cases Crosses 100) जवळपास 250 भाविक करतारपूर साहिबचे दर्शन करण्यासाठी जात आहेत.

संबंधित बातम्या :

इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *