CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी

यंदा कर्तव्य आहे असं म्हणत बोहल्यावर चढण्याची तयारी केलेल्या लग्नांळूच्या (Wedding event cancel due to corona) आनंदावर आता कोरोना व्हायरसने विरजण टाकलं आहे.

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी 'कोरोना' अटी

पुणे : यंदा कर्तव्य आहे असं म्हणत बोहल्यावर चढण्याची तयारी केलेल्या लग्नांळूच्या (Wedding event cancel due to corona) आनंदावर आता कोरोना व्हायरसने विरजण टाकलं आहे. कोरोनाने दोन जिवांच मिलन घडवून आणणाऱ्या विवाह सोहळ्यातील अंतरपाटाचे अंतर वाढवलं आहे. पुण्यात होणाऱ्या सामूहिक विवाहा सोहळ्यात वधू-वराने दोघांमध्ये तीन फूट अंतर ठेवावे. तसेच एकाही नातेवाईकांनी विवाहाला जाऊ नये, असा अजब सल्ला पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Wedding event cancel due to corona) यांनी दिला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरवात झाल्यावर शासनाने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह साथ रोग नियंत्रण कायदा लागू केला. त्यामुळे शाळा, कॉलेज, जिम, स्विमिंग पूल, थिएटर, बागा अशी सर्व गर्दी होणारी ठिकाणी पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. पण मार्च, एप्रिल हा लग्नाचा सिझन असल्याने अनेकांचे लग्नाचे मुहूर्त काढून झालेत.

वाजंत्री गलबला करण्यासाठीही तयार झाली आहे. पण कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. अन एवढी सगळी तयारी झाल्यावर लग्न सोहळा रद्द करायला सांगणे, किंवा तारीख पुढं ढकलायला सांगणं म्हणजे तस अवघड काम आहे. यावर तोडगा म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी वधू वरांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवायला सांगितलं आहे.

जिल्हा प्रशासन कोरोना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना नागरिक देखील स्वतःहून अनेक कार्यक्रम रद्द करण्याची तयारी दाखवत आहेत. पण आम्ही जो लग्नाचा हॉल बुक केलाय त्याचे पैसे तुम्ही परत मिळवून देण्याची खात्री देणार का असा सवाल विभागीय आयुक्तांना केला जात आहे.

कोरोनाच्या धास्तीने लग्न, मुंजी, वाढदिवसाचे सगळे बेत अनेक जण पुढे ढकलत आहेत. याचा फटका मंगलकार्यालय आणि लग्न लावणाऱ्या भटजींनाही बसत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाववर सगळीकडे एकप्रकारो भीतीचे वातावरण आहे. तर बोहल्यावर चढणारे लग्नाळू मात्र काहीसे नाराज झालेत. त्यामुळे गो कोरोना गो अशी मनापासून प्रार्थना केली जात आहेत.

संबधित बातम्या :

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 वर, मुंबईत आणखी चौघांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

Published On - 8:00 pm, Sat, 14 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI