AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला (Corona virus School college closed) आहे.

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद, 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
| Updated on: Mar 14, 2020 | 10:03 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली (Corona virus School college closed) आहे. राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज आणि मॉल्स बंद ठेवण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona virus School college closed)  रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये या 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात याद्वारे सूचित करण्यात येत आहे.

या सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा तसेच विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित संस्था प्रमुखास देण्यात याव्यात, असेही सांगितले आहे.

राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीयव्यावसायीकयात्राधार्मिकक्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. नुकतंच यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही दुबईतून आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 9 जण दुबईला गेली होती. यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघेही यवतमाळमधील आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूरनंतर यवतमाळमध्येही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

नागपूरमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण

नागपुरात आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. नागपुरात आता एकूण चार कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या नव्या रुग्णाला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच नागपुरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यासोबत देशातीलही कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होऊन 84 झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली  (Corona virus School college closed) आहे.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.