3 वर्षांपूर्वीही झाला होता भीषण विमान अपघात, अजितदादांच्या प्लेन दुर्घटनेशी काय कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर
28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. परंतु बारामतीच्या विमान तळावर टेक ऑफ करताना या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजितदादांचा मृत्यू झाला.

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. परंतु बारामतीच्या धावपट्टीवर पोहोचताच या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. खराब दृश्यमानतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पायलटला अंदाज आला नाही, त्यामुळे विमान धावपट्टीवर उतरताना विमान क्रॅश झालं, असा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता. ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान व्हिसीआर कंपनीचं होतं. दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी असाच एक अपघात सप्टेंबर 2023 मध्ये देखील झाला होता. मुंबई विमानतळावर एक विमान लँन्ड होताना कोसळलं होतं. हे चार्टर विमान देखील विसीआर कंपनीचंच होतं. या अपघाताचा फायनल रिपोर्ट आता एअर अॅक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो AAIB कडून जारी करण्यात आला आहे.
या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे, पायलटच्या अनस्टेबलाइज़्ड अप्रोचमुळे हा अपघात झाल्याचं कारण एएआयबीने आपल्या अहवालामध्ये नमूद केलं आहे. हे विमान देखील व्हिसीआर कंपनीचंच होतं. हे विमान रन वे वर कोसळलं. या अपघातामध्ये दोन क्रू मेंबर, आणि सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते. फ्लाइंग क्रू कडून एसओपीचं पालन व्यवस्थित करण्यात आलं नाही, म्हणून हा अपघात झाला. दरम्यान या कंपनीच्याच विमानाचा बारामतीमध्ये देखील अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. विमानात असलेल्या इतरही लोकांचा मृत्यू झाला.
आपल्या अहवालामध्ये एएआयबीने म्हटलं की, 14 सप्टेंबर 2023 मध्ये एक नॉन शेड्यूल पॅसेंजर फ्लाइटने मुंबईला येण्यासाठी विखाखापट्टनमवरून टेक ऑफ केलं होतं. जेव्हा या विमानाने टेक ऑफ केलं तेव्हा कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे या विमानाला धावपट्टी क्रमांक 27 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र जेव्हा हे विमान लँड होणार होतं, तेव्हा मुंबईमध्ये अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे दृश्यमानता प्रचंड कमी झाली. त्यामुळे हा अपघात घडला. हे विमान लँड होत असताना डाव्या बाजुने झुकलं त्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणं पायलटला शक्य झालं नाही, आणि विमान क्रॅश झालं. खराब हवामान असताना पायलटने विमान लँड करण्याचा निर्णय घेतला, सूचना देखील उशिरा मिळाली, असंही एएआयबीने आपल्या अहवालामध्ये म्हटलं आहे.