मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर नुकतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. मुंबई हाय कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांची यांचिक फेटाळली आहे. त्यामुळे आता विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलावर आहे. पालघरच्या जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होत, त्यावर आता मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शिववसेना ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांना अखेर दिलासा मिळालाच नाही. मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांची याचिका फेटाळून लावली आहे. पालघरच्या जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होतं. जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर मुंबई महानगर पालिकेने राज्य सरकारला पत्र लिहित नगरसेवक पद रद्द झाल्याच जाहीर करायला सांगितलं होतं, त्यामुळे विशाखा राऊत यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र पालिकेच्या या पत्रव्यवहाराला विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल होतं, मात्र त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. राऊत यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे, त्यामुळे आता विशाखा राऊत यांच्या अडचणी वाढल्या असून, त्याचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे.
दुसरीकडे आज शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणचां यावर सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पार पडला आहे. मागच्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे वकील कौल यांनी शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडली, यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून काही महत्त्वाचे कागदपत्र देखील कोर्टात सादर करण्यात आले आहेत. 2018 साली संघटनेत ज्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यातील अनेकजण हे निवडणूच आले नव्हते असा दावा यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.