महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार? शिंदे गटातील नेत्यांच्या दाव्यानंतर बड्या नेत्याने सगळं सांगितलं

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महायुतीतील सर्व निर्णय हे संगनमताने होतात आणि सध्या मुख्यमंत्री बदलण्याचा कोणताही अजेंडा नाही, असं म्हटलं आहे. ते टीव्ही9 मराठीसोबत बोलत होते.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार? शिंदे गटातील नेत्यांच्या दाव्यानंतर बड्या नेत्याने सगळं सांगितलं
pravin darekar on mahayuti cm
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 9:15 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9मराठी प्रतिनिधी: सीएम बदलण्याचा सध्यातरी कोणताही अजेंडा नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यात उत्तम समन्वय आहे. अशात महायुतीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी स्टेटमेंट करणं बरोबर नाही. मीडियात बोलून कोण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होत नाही. शिंदे, सुनेत्रा वहिनी आणि सीएम असा महायुती म्हणून कुठलाही निर्णय होतो. त्यामुळे आमच्या सारख्या कोणीही मुक्ताफळं उधळू नये, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

जबाबदार नेत्यांनी वक्तव्य केलं तर गांभीर्याने घेतलं पाहिजे. जे बोलतात ते अधिकृत भूमिका आहे असं वाटत नाही. बच्चू कडू, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत रघुवंशींना सीरियस घ्यायची गरज नाही. प्रसिद्धिसाठी ते अशी वक्तव्ये करत असतात हा इतिहास आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

Loading...

दरम्यान, राज्यामध्ये नेहमीच मुख्यमंत्री बदलाबद्दल शिंदे गटाचे अनेक नेते अनेकदा बोलत असतात. त्यावरुन नेहमी चर्चा रंगत असते. यावरुन भाजपनेही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. शिवसेना पक्षाचे दोन गट झाल्यानंतर राज्यात फडणवीस सरकार येईल अशी शक्यता होती. पण अचानकपणे शिंदेंचं नाव घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शिंदे यांनीच मुख्यमंत्री राहावं अशी भूमिका शिंदे गटाच्या आमदारांनी घेतलेली होती. त्याच पार्श्वभूमिवर राज्यातील मुख्यंमत्री बदलाच्या चर्चा होत असतात.

दरम्यान, मध्यंतरी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आहेत, अशा स्वरुपाच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे केंद्रात देवेंद्र फडणवीस जाणार असतील तर त्याचा अर्थ मुख्यमंत्रीपदावर सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बसतील अशा चर्चा रंगतात. शिंदे गटाकडून बच्चू कडू, रवींद्र धंगेकर यांसारख्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्ये केली जात असल्याने आज भाजप नेते प्रवीण दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us