भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण, चौघांचा शोध सुरु

| Updated on: Mar 26, 2021 | 7:44 AM

नवी मुंबईचे नेते आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. (MLA Ganesh Naik Grandson Beating)

भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण, चौघांचा शोध सुरु
Ganesh Naik Grandson Sankalp Naik Beating
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईचे नेते आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांचा शोध सुरु आहे. माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे. (BJP MLA Ganesh Naik Grandson Sankalp Naik Beating)

कृषीकेंद्र शोधण्यासाठी जाताना मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री आणि सध्याचे भाजप आमदार गणेश नाईक यांचा नातू संकल्प संजीव नाईक आणि त्याचा मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषीकेंद्र शोधण्यासाठी जात होते. त्यावेळी माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना तळवली गावाजवळून त्यांनी आपली गाडी पुन्हा मागे फिरवली. यावेळी गाडीच्या मागून येणारा एक दुचाकीस्वार गाडीला धडकला. त्यामुळे तो खाली पडला.

त्याचवेळी संकल्प नाईक आणि त्याचा मित्र गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या दुचाकीस्वाराला उचलले. त्याला त्याचे नाव विचारले असता, त्याने प्रविण रघुनाथ लिहे असे सांगितले. त्याचवेळी जखमी झालेल्या प्रविण यांचा मुलगा निलेश जवळच असलेल्या हनुमान हॉटेल येथे होता. त्याच्यासोबत त्याचे इतर तीन साथीदारही होते. त्या चौघांनी मिळून संकल्प नाईक आणि त्याच्या मित्राला मारहाण केली.

चार जणांचा शोध सुरु 

याप्रकरणी निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे. याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात 108/2021 भदविस कलम 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तेजेंद्रसिंग मंत्री यांच्या गळ्यातील सव्वातोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली आहे. सध्या याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

(BJP MLA Ganesh Naik Grandson Sankalp Naik Beating)

संबंधित बातम्या : 

भाजप आमदार गणेश नाईक अजित पवारांच्या भेटीला

नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस द्या; गणेश नाईकांची महापालिकेकडे मागणी