भाजप आमदार गणेश नाईक अजित पवारांच्या भेटीला

पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान भाजप आमदार गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. (ganesh naik ajit pawar)

भाजप आमदार गणेश नाईक अजित पवारांच्या भेटीला
गणेश नाईक आणि अजित पवार

मुंबई : पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister) यांची भेट घेतली. नवी मुंबई शहरातील काही भूखंड अजूनही नवी मुंबई महापालिकेला मिळालेले नाहीत. ते मिळावेत म्हणून गणेश नाईक यांनी अजित पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. (BJP MLA Ganesh Naik visited deputy chief minister Ajit Pawar for Navi Mumbai land issue)

अजित पवारांच्या भेटीवर नाईक काय म्हणाले?

या भेटीविषयी बोलतना नाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “नवी मुंबई शहरात असे अनेक भूखंड आहेत; जे अजूनही महानगरपालिकेला मिळालेले नाहीयेत. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी भेट घेतली. लवकरात लवकर हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळावेत अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. कारण हे भूखंड लोकांसाठी आहेत. लोकांसाठी घरांच्या गरजेचा विषय महत्वाचा आहे. सध्या कुटुंब वाढल्यामुळे अनेकांना घरांचा विस्तार करावा लागला आहे. त्यामुळे हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळणे गरजेचे आहे. हीच मागणी गेऊन मी अजित पवार यांना भेटायला गेलो,” असे गणेश नाईक म्हणाले.

गणेश नाईक भाजप सोडण्याची डिसेंबरमध्ये चर्चा

दरम्यान, गणेश नाईक भाजप सोडण्याची चर्चा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झाली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”, असा दावा केला होता. त्यानंतर भाजपतील अनेक नेते राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चा सुरु झाली होती. भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार गणेश नाईक यांचेही नाव घेतले जात होते. त्यावेळी या चर्चेविषयी बोलताना नाईक यांनी पक्षबदलाचे सर्व आरोप फेटाळून लावत या सर्व बातम्या कपोलकल्पित असल्याचे म्हटले होते. पक्ष प्रवेशाच्या खोट्या बातम्या पेरुन विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नसल्याचं त्यावेळी नाईक यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आता नाईक यांनी अजित पवार यांची भेटली आहे. या भेटीत विकासकामांविषयी चर्चा झाल्याच सांगण्यात येतंय.

इतर बातम्या :

Navi Mumbai Municipal Election 2021 : नवी मुंबईत मतदारांची हेराफेरी, एका मतदाराचा भाव पाचशे रुपये!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI