राष्ट्रवादीकडून घरवापसीची साद, गणेश नाईक भाजप सोडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे गणेश नाईक म्हणाले.( Ganesh Naik clear his stand on NCP)

राष्ट्रवादीकडून घरवापसीची साद, गणेश नाईक भाजप सोडणार?
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 12:43 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी पक्षात घरवापसी होणार असल्याचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेलेले नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येऊ शकतात, असं जयंत पाटील म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या यादीत नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नावाचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, मात्र, गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. (Ganesh Naik clear his stand on joining NCP)

गणेश नाईक काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले. नाईक यांनी भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले. पक्ष प्रवेशाच्या खोट्या बातम्या पेरुन विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नसल्याचा टोला गणेश नाईकांनी लगावला आहे.

पंतप्रधान आवास योजनेला विरोध नसून सूचना

नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेची घरे ही बस स्टँड ,रेल्वे स्थानकांच्या पार्किंगच्या जागेत उभारली जात आहेत. हा निर्णय कोणत्या बुद्धिवान माणसाने घेतला?, असा थेट सवाल भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला होता.ही योजना नवी मुंबईतून हलवून पनवेल जवळील नैना क्षेत्रात राबवण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच पत्राद्वारे करणार असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले.

भाजप सोडून परत या, अजित पवारांची साद

एकीकडे जयंत पाटलांनी मेगाभरतीची घोषणा केली, तर दुसरीकडे अजित पवारांनीही थेट नेत्यांना साद घालून, राष्ट्रवादीत परत येण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार, जयंत पाटील यांच्या या आवाहनानंतर आता राष्ट्रवादीतून गेलेले दिग्गज नेते आता कोणता निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीची मेगाभरती

“भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. जयंत पाटील यांनी हे विधान करुन राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांसाठी आपली दारं पुन्हा उघडी असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.

“गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, त्यांना तिथे उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल”, असं जयंत पाटलांनी म्हटलं.

संबंधित बातम्या:

शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?   

राष्ट्रवादीचा धमाका, अवघ्या दोन महिन्यात तब्बल पाच माजी आमदारांच्या हाती घड्याळ 

( Ganesh Naik clear his stand on joining NCP)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.