शिंदेंनी तो उठाव केला नसता तर भाजपाला सत्ता दिसली नसती, केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन
जरांगे पाटील यांनी भाजपाची ती ऑडिओ क्लिपपुढे आणल्यानंतर भाजपा नेते आणि शिवसेना नेते यांच्यातच जुंपली आहे, दोन्ही बाजूचे नेते ऑडिओ क्लिपची चौकशी करा अशी मागणी करत आहेत. यावर आता केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपली भूमिका मांडली आहे.

एकनाथ शिंदे यांनी तो उठाव केला नसता तर भाजपला अडीच वर्षे ही सत्ता दिसली नसती असा हल्लाबोल केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांचा गळा एवढा नाजूक नाही की कोणी केसाने त्यांचा गळा कापले. एकनाथ शिंदे हे मजबूत नेतृत्व आहे.महाराष्ट्रात जनतेने त्यांना मान्यता दिली परंतू ‘त्या’ ऑडिओ क्लिपची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी तर ५० आमदार सोबत आणले नसते तर भाजपाला सत्तेची दारे उघडी झाली नसती. बिहारात कमी आमदार असताना त्यांनी नितेश कुमार यांना मुख्यमंत्री केलं,राजकीय तडजोडी असतात आणि हे निर्णय दिल्लीवरून होत असतात. NDA मधून कोणाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करायचे हे निर्णय वरिष्ठ नेते घेतात. त्यांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांच्या निर्णयाविरोधात घ्यावा असेही केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
जरांगे यांनी बाहेर काढलेली ऑडिओ क्लिप अडीच वर्षे जुनी क्लिप असावी. विधानपरिषद निवडणुकीचा वेळी काही बाहेर येऊ शकते, याची चौकशी झाली पाहिजे. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे एक मोठं नेतृत्व आहे. या ऑडिओ क्लिपची तपासणी झाली पाहिजे. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे मोठे नेतृत्व आहे. एका मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याने दुसऱ्या मराठा समाजातल्या मोठ्या नेत्याची बदनामी होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.ऑडिओतील गंभीर आरोपाची चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे असेही केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
अरेला कारेची भाषा आम्हालाही बाळासाहेबांनी शिकवली
अरेला कारेची भाषा आम्हालाही बाळासाहेबांनी शिकवली आहे. ती आमच्या रक्तामध्ये आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये जी नावे आहे, ती भाजपशी संबंधित आहे. मित्रपक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर भाजपनेच चौकशीची मागणी केली पाहिजे. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याची तत्काळ चौकशी करून जनतेसमोर आणावं असेही प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचा गळा एवढा नाजूक नाही
भाजपा एकनाथ शिंदे यांचा गळा केसाने कापण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्या संदर्भात विचारले असते प्रतापराव जाधव म्हणाले की एकनाथ शिंदे यांचा गळा एवढा नाजूक नाही, की कुणी केसाने गळा कापेल. एकनाथ शिंदे मजबूत नेतृत्व आहे, महाराष्ट्रात जनतेने त्यांना मान्यता दिली आहे. मात्र, हे जे काही चाललेलं आहे ते बरोबर नाही असेही जाधव यावेळी म्हणाले.
शिंदे यांचे नेतृत्व अतिशय संयमी
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व अतिशय संयमी आहे .आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकांनी घाणेरडे आरोप केले, पण त्यांनी कधीच त्याचे उत्तर दिलं नाही. म्हणूनच लोक त्यांना आपला नेता मानतात असेही ते यावेळी म्हणाले. श्रीकांत शिंदे कधीही कोणत्या निर्णयात नसतात, त्यांना सुद्धा यात आहे गोवण्याचा प्रयत्न, ते चुकीचे आहे असेही प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.