Sachin Ahir : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांना धक्का, त्यांच्या अधिकारांना लावली कात्री

Sachin Ahir : महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी सचिन अहिर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते वाजतगाजत पक्षप्रवेश झाला होता. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणारे ते पहिले आमदार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची नेमणूक झाली आहे.

Sachin Ahir : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांना धक्का, त्यांच्या अधिकारांना लावली कात्री
Sachin Ahir-Eknath Shinde
| Updated on: Oct 17, 2026 | 8:33 AM

निखिल चव्हाण, प्रतिनिधी : काही महिन्यांपूर्वी सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेचं उपसभापती बनवलं. मोठा गाजावाज करत त्यांचा पक्ष प्रवेश झाला होता. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फोडल्यानंतर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणारे ते पहिले आमदार होते. सचिन अहिर यांना शिंदेंनी उपसभापती बनवून मानाचं पान दिलं आहे. पण आता विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अधिकारांना कात्री लावली आहे. हा सचिन अहिर यांच्यासाठी एक धक्का आहे. वाढत्या शासकीय बैठकांमुळे लोकशाहीच्या मंदिरात संघर्ष.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु नसते तेव्हा अभ्यागत, शासकीय अधिकारी, नागरीक यांना उपसभापती आणि उपाध्यक्ष कार्यालयाच्या परवानगीने इमारतीमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून प्रवेश दिला जात होता. 3 सप्टेंबर पासून मात्र सभापती आणि अध्यक्ष यांच्या कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी सर्व अभ्यागतासाठी अनिवार्य करण्यात आली असून नव्या नियमावलीमुळे पीठासन अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे अनुक्रमे प्रा. राम शिंदे आणि राहूल नार्वेकर आहेत. तर उपसभापती पदी शिवसेनेचे (शिंदे) सचिन अहिर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे (अजित पवार) अण्णा बनसोडे आहेत. उपाध्यक्ष बनसोडे यांच्या दालनात बैठका मोठ्या संख्येने होत असतात.

Loading...

काय अधिकार काढून घेतला?

सोमवार, मंगळवार वगळता प्रतीदिन दोन शासकीय बैठका तरी उपाध्यक्षांच्या दालनात होतातच. तसेच उपासभापती सचिन अहिर मुंबईकर असल्याने त्यांच्या विधिमंडळातील दालनात अभ्यागतांची गर्दी असते. आता मात्र उपसभापती आणि उपाध्यक्ष कार्यालयाच्या परवानगीचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती तर अण्णा बनसोडे उपाध्यक्ष आहेत. इमारतीमध्ये परवानगीसाठी सभापती आणि अध्यक्ष यांच्या कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे अहिर आणि बनसोडे यांच्या कार्यालयाचं महत्व कमी झालं आहे. सचिन अहिर हे वरळीमधून येतात. त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद भूषवण्याचा अनुभव आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us