बुलडाणा आणि चिखली मतदारसंघात 90 टक्के बोगस मतदार, तब्बल 21 हजाराहून अधिक मतदारांना मतदान यादीतून वगळले

| Updated on: Jul 10, 2021 | 10:50 AM

या मतदारांना सूचित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये त्यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही.

बुलडाणा आणि चिखली मतदारसंघात 90 टक्के बोगस मतदार, तब्बल 21 हजाराहून अधिक मतदारांना मतदान यादीतून वगळले
voter
Follow us on

बुलडाणा : मतदार यादीत नावासमोर फोटो नसलेल्या मतदारांची शोध मोहिम राबवण्यात आली होती. यानतंर आता बुलडाणा आणि चिखली मतदारसंघातील 21 हजार 379 बोगस मतदार वगळण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच बुलडाणा तहसीलदार रुपेश खंदारे यांनी ही कारवाई केली आहे. (Buldana and Chikhali assembly constituencies 21379 voters have been excluded from the voter list)

बुलडाणा आणि चिखली विधानसभा मतदार संघातील 22 हजार 207 मतदारांपैकी तब्बल 21 हजार 379 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. या वगळलेल्या मतदारांमध्ये बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील 17 हजार 889 तर चिखली मतदार संघातील 3 हजार 490 मतदारांचा समावेश आहे. या वगळलेले मतदारांपैकी काही मतदार बाहेर गावी गेले आहे. तर काही मतदार हे बोगस मतदार होते. ज्याच्या नावाने बोगस मतदान केले जात असल्याची बोललं जात आहे.

शोधमोहिमेला कोणताही प्रतिसाद नाही

बुलडाणा आणि चिखली मतदारसंघातील मतदारांच्या याद्यांमधील अनेक मतदारांच्या नावासमोर फोटो नसणाऱ्या मतदारांची डिसेंबर 2020 मध्ये पत्याची शोध मोहीम बीएलओ मार्फत करण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा विधानसभा क्षेत्रातील आणि चिखली मतदार क्षेत्रातील 22 हजार 207 मतदार आपल्या मूळ पत्त्यावर मिळून आले नाही. याबाबत जानेवारी, फेब्रुवारी आणि मे महिन्यात पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारासाठी गावनिहाय तसेच शहरनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली. यानंतर या मतदारांना सूचित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये त्यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर सापडून न आलेल्या मतदारांना आणखी एक संधी देण्यात आली. त्यानुसार पुन्हा जून महिन्यामध्ये राजकीय पक्षांचा नेत्यांना आपल्या मूळ पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारांची यादी देण्यात आली. तसेच जर हे मतदार आपल्या संपर्कातील असतील तर त्यांना आपला फोटो आणि रहिवाशांचे कागदपत्रे बुलडाणा तहसील कार्यालयात जमा करावे, अशी सूचना करण्यात आली. मात्र अनेक राजकीय नेत्यांनी याला काहीही प्रतिसाद दिला नाही.

कोणत्या तालुक्यातील किती मतदार?

यानंतर अखेर बुलडाणा आणि चिखली विधानसभा क्षेत्रातील तब्बल 21 हजार 379 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. वगळण्यात आलेले मतदार हे बोगस मतदार आहे. तर काही प्रमाणात याच मतदारांच्या नावे किंवा या मतदारांना दुसऱ्या ठिकाणाहून आणून मतदार करून घेत जात असल्याचे बोलले जात आहे.

यामध्ये बुलडाणा तालुक्यातील 13 हजार 310 मतदारांपैकी 13 हजार 63 मतदार , मोताळा तालुक्यातील 5 हजार 160 मतदारांपैकी 4 हजार 826 मतदार, तर चिखली मतदार संघाच्या मतदार याद्यांमध्ये 3 हजार 773 मतदारांपैकी 3 हजार 490 मतदार आपल्या मूळ पत्त्यावर आढळून आले नाही. त्यामुळे त्यांना या मतदार याद्यांमधून वगळण्यात आले आहे.

(Buldana and Chikhali assembly constituencies 21379 voters have been excluded from the voter list)

संबंधित बातम्या :

“मुख्यमंत्र्यांना 3 स्मरणपत्रं, तरीही शेतकऱ्यांना मदत नाही, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चूक सुधारली, बी.कॉमचे 11 हजार विद्यार्थी उत्तीर्ण

नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तपास सीआयडीकडे, तिघा पोलिसांची बदली