AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तपास सीआयडीकडे, तिघा पोलिसांची बदली

पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाने यांची बदली करण्यात आली आहे. तर मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपवण्यात आला आहे.

नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तपास सीआयडीकडे, तिघा पोलिसांची बदली
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 9:44 AM
Share

नागपूर : नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, तर तिघा पोलिसांची बदली करण्यात आली आहे. मनोज ठवकर याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मनोजला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर शेकडोचा जमाव रस्त्यावर उतरला होता. (Nagpur Man Manoj Thavkar beaten up by Police CID enquiry)

नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणातील तीन पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाने यांची ट्रान्सफर करण्यात आली आहे. तर मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. त्याचा एक पाय कृत्रिम असल्याची माहिती आहे. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली.

पोलिसांच्या मारहाणीनंतर बेशुद्ध

मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी ठवकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केल्यावर मृत घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर रुग्णालय परिसरात त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली होती.

हॉस्पिटलबाहेर मोठा जमाव

पोलिसांच्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मनोजच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई, पत्नीला सरकारी नोकरी आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी जमावाने केली होती. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटल परिसरात तणाव होता.

संबंधित बातम्या :

कुख्यात गुंड सहा महिन्यांपूर्वी जेलमधून सुटला, नागपूरच्या पांढरबोडी भागात घुसताच दुश्मनांनी घेरलं, विटांनी ठेचून हत्या

डोक्यातील गाठीवर दहा हजारात शस्त्रक्रिया, तरुणीचा मृत्यू, बोगस डॉक्टरला अटक

(Nagpur Man Manoj Thavkar beaten up by Police CID enquiry)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.