डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चूक सुधारली, बी.कॉमचे 11 हजार विद्यार्थी उत्तीर्ण

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉमच्या 11 हजार विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. बी. कॉमचे 11 हजार विद्यार्थी अखेर उत्तीर्ण झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चूक सुधारली, बी.कॉमचे 11 हजार विद्यार्थी उत्तीर्ण
BAMU EXAMS

औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉमच्या 11 हजार विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. बी. कॉमचे 11 हजार विद्यार्थी अखेर उत्तीर्ण झाले आहेत. अकरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर कुलगुरुंनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर बी.कॉमच्या अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे. (Dr. Babasaheb Ambdekar Marathwada University decided to pass B.Com Students in who declared fail due to fault of Data Entry Operator)

कसा घडला प्रकार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. कॉमच्या परीक्षेला बसलेल्या 11321 विद्यार्थ्यांची घेतली होती परीक्षा त्यांच्यातील 11137 अनुत्तीर्ण झाल्याची कुलगुरूंकडे आली होती. औरंगबादमधील विद्यार्थी संघटनांनी याप्रश्नी कुलगुर डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत हा प्रश्न मांडला होता. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.एवढ्या मोठ्य़ा संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानं यावरुन गोंधळ देखील झाला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटरच्या चुकीमुळं हा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे.

डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या चुकीमुळे तब्बल 11 हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. अखेर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशाने प्रवीण साबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ऑपरेटरच्या चुकीमुळे एकाच वेळी अकरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते.

विद्यार्थी संघटना आक्रमक

बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर विद्यापीठ कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील निकाल जाहीर करताना आलेल्या त्रुटी दाखवून दिल्या. विद्यार्थी संघटनांनी बी. कॉमची निकाल प्रक्रिया सदोष असल्याचं दाखवून दिलं आहे. पुढील काळात निकाल जाहीर झाल्यानंतर असा प्रकार आढळून आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये घेतो, माझी जबाबदारी आहे : संभाजीराजे छत्रपती

औरंगाबादेत सप्टेंबरपासून संतपीठाची सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन, उदय सामंत यांची माहिती

(Dr. Babasaheb Ambdekar Marathwada University decided to pass B.Com Students in who declared fail due to fault of Data Entry Operator)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI